बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती : अमेझॉनचा जेफ बेजोस

अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटचा सीईओ जेफ बेजोस आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. ब्लूमबर्ग आणि फोर्ब्सनं जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत बेजोसला पहिलं स्थान दिलं आहे. ब्लूमबर्गच्या मते, बुधवारपर्यंत बेजोसची संपत्ती 106 अब्ज डॉलर एवढी होती. तर फोर्ब्सनुसार त्याची संपत्ती 105 अब्ज डॉलर एवढी आहे.

याआधी हा विक्रम मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्सच्या नावावर होता. 1999 साली त्याची संपत्ती 100 अब्ज डॉलर एवढी होती. पण आता बेजोसनं त्याचा विक्रम मोडीत काढला आहे. अमेझॉनच्या शेअरमधून बेजोसकडे सर्वाधिक संपत्ती जमा झाली आहे. 2017 मध्ये त्याचे शेअर जवळजवळ 57 टक्क्यांपर्यंत पोहचले होते.