मारुती कंपनीने कारच्या किंमती वाढल्या
अर्थसंकल्पापूर्वी मारुती कंपनीने आपल्या कारच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळे मारुती कंपनीच्या कार १७ हजार रुपयांपर्यंत महागल्या आहेत. नव्या किंमती लागूही करण्यात आल्या आहेत. मारुती कंपनीच्या वेगवेगळ्या मॉडेल्सवर १७०० रुपयांपासून १७ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. अॅडमिनिस्ट्रेशन कॉस्ट, रॉ मटेरियल आणि वितरण खर्चात वाढ झाल्याने कारच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. मारुती कंपनीने गेल्या महिन्यात इयर इंड सेल दरम्यान ग्राहकांना कल्पना दिली होती की, नव्या वर्षात कारच्या किंमतीत वाढ होऊ शकते.
होंडा कार्सने आठ जानेवारीपासून आपल्या सर्व मॉडल्सच्या किंमतीत वाढ केली आहे. वेगवेगळ्या मॉडल्सवर ६००० रुपयांपासून ३२००० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. फोर्ड इंडियानेही आपल्या कारच्या किंमतीत ४% नी वाढ केली आहे. मारुती कंपनीच्या आधी टाटा मोटर्सने आपल्या कारच्या किंमतीत वाढ केली आहे. टाटा मोटर्सने १ जानेवारीपासून २५ हजार रुपयांपर्यंत आपल्या कारच्या किंमती वाढवल्या आहेत. यासोबतच ह्युंदाई, महिंद्रा अँड महिंद्रा, स्कोडा, रेनॉने ही या महिन्यात आपल्या कारच्या किंमतीत वाढ केली आहे.