शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जानेवारी 2018 (09:54 IST)

एसबीआय ग्राहकांना खुशखबर

एसबीआयने आपल्या बेस रेट आणि मार्क प्राइम लेंडिंग रेटमध्ये ३० बेसिस पॉईंटने कपात करण्याची घोषणा केली आहे. एसबीआयचे नवे दर १ जानेवारी २०१८ पासून लागू झाले आहेत. एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाने आपला बेस रेट ८.९५ टक्क्यांवरुन ८.६५ टक्के केला आहे. तसेच बीपीएलआरही १३.७० टक्क्यांवरुन १३.४० टक्के केला आहे. याचा फायदा एसबीआयच्या जवळपास ८० लाख ग्राहकांना होणार आहे.

एसबीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे गृह कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच बँकेने गृह कर्जाच्या प्रोसेसिंग शुल्कात दिलेली सूट ही ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे.