रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 30 डिसेंबर 2017 (15:44 IST)

देशभरातील भोंदू बाबांची दुसरी यादी जाहीर

अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील भोंदू बाबांची दुसरी यादी जाहीर केली. भोंदू बाबांच्या यादीत दिल्लीचा विरेंद्र दीक्षित, बस्ती येथील सचिदानंद सरस्वती आणि अलाहाबाद येथील त्रिकाल भवंता यांच्या नावांचा समावेश आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांच्या अध्यक्षतेखाली अलाहाबादमध्ये देशातील १३ आखाड्यांच्या प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत या यादीतील नावांवर निर्णय घेण्यात आला. आम्ही जाहीर केलेल्या यादीतल्या भोंदू बाबांपासून सावध राहा असे आवाहन महंत नरेंद्र गिरी महाराजांनी केले. आम्ही जाहीर केलेली ही नावे अशी आहेत जी कोणत्याही संप्रदाय किंवा परंपरांमधून येत नाहीत असेही महंत नरेंद्र गिरी यांनी स्पष्ट केले.

अखिल भारतीय आखाडा परिषद ही सगळ्या आखाड्यांची प्रमुख संस्था आहे. या संस्थेची स्थापना आद्य शंकराचार्यांनी ८ व्या शतकात केली होती. याआधीही आखाडा परिषदेने देशातील भोंदू बाबांची यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये आसाराम बापू, त्यांचा मुलगा नारायण साई, निर्मलबाबा, राधे माँ, रामपाल, गुरुमीत राम रहिम यांच्यासहीत १४ नावांचा समावेश होता. आता दुसऱ्या यादीद्वारे देशातील इतर भोंदू बाबांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत.