गुरूवार, 27 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दहशतवाद्यासोबत पॅलेस्टिनी राजदूत कसे काय बसू शकतात?

Palestine's Pakistan envoy shares dais with Hafiz Saeed
पाकिस्तानातील पॅलेस्टिनिअन राजदूताने मुंबई हल्ल्याचा सुत्रधार हाफिज सईदने आयोजित केलेल्या रॅलीत सहभाग घेत त्याच्यासोबत व्यासपीठावर हजेरी लावली आहे. याबाबत भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. याप्रकरणाची पॅलेस्टिनी सरकारकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानातील रावळपिंडी येथे या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
 
भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील एका प्रवक्त्यांनी शुक्रवारी याप्रकरणी एक निवेदन प्रसिद्ध केले. या निवेदनानुसार,भारताला हव्या असलेल्या दहशतवाद्यासोबत पॅलेस्टिनी राजदूत कसे काय बसू शकतात? असा सवाल करीत भारताने यावर आक्षेप घेतला आहे.