मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (09:38 IST)

कुलभूषण जाधव यांची आई पत्नी सोबत भेट

आपल्या देशातील असलेले कुलभूषण जाधव हे सध्या  हेरगिरी केल्याच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या ताब्यात आहे. कुलभूषण हे  भारतीय नौदलातील निवृत्ती अधिकारी आहेत.  जाधव दीड वर्षांनंतर कुटुंबीयांना भेटले आहेत. हेरगिरी प्रकरणी पाकिस्तानातील कोर्टानं कुलभूषण जाधव यांनी मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. यामध्ये   कुलभूषण जाधव यांची आई अवंतिका जाधव आणि पत्नीसोबत इस्लामाबाद येथील पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात भेट घेतली आहे. ही भेट होतेय म्हणून  पाकिस्ताननं अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती.  पाकिस्ताननं सुरक्षा व्यवस्थेत शार्प शूटर, पाकिस्तानीर रेंजर्स आणि निमलष्करी दलदेखील तैनात होते.  जाधव कुटुंबीयांसोबत भारताचे उप-उच्चायुक्त जे.पी.सिंह आणि पाकिस्तानी महिला अधिकारीदेखील होते..

ज्या मार्गावर परराष्ट्र मंत्रालयाचे कार्यालय स्थित आहे तेथे सर्वसामान्य नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाबाहेर मीडिया कर्मचा-यांचीही प्रचंड गर्दी होती.  जाधव कुटुंबीय पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालय परिसरात दाखल झाल्यानंतर त्यांनी मीडियाला अभिवादनदेखील केले होते  मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकर दिला नाही. भारत सरकारने आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेत कुलभूषण यांच्या शिक्षेवर स्टे मिळवला आहे.