रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (09:35 IST)

आईच्या प्रियकराचा त्यांनी केला खून

धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये ठाणे परिसरात घटना घडली असून यामध्ये  आई बरोबर प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून मुलांनी अब्दुल हाफिझ अन्सारीची (50) चॉपरने भोसकून खून केला आहे. भिवंडीमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणात   अब्दुल अन्सारी आरोपींच्या शेजारी रहात होता. यात या मृत व्यक्तीचे आरोपींच्या आईबरोबर प्रेमसंबंध आणि शारीरिक सबंध  होते. हा राग त्यांना होता यातून  सरफराझ शेख (25) आणि सैफ शेख (27) या दोघांनी अब्दुल अन्सारीची हत्या केली आहे. या प्रकरणात दोघांनी अब्दुल चहा पिऊन घरी परतत असताना त्याला गाठले होते  त्याच्यावर चॉपरने सहा ते सात वार  केले आहे. अब्दुल एका रेशनिगच्या दुकानात मदतनीस म्हणून काम करायचा. सरफराझ आणि सैफ एका हातमाग कारखान्यात काम करतात.  अब्दुलची हत्या करुन सरफराझ आणि सैफ घटनास्थळावरुन पळून गेले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत.