सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 डिसेंबर 2017 (08:56 IST)

विदर्भ, मराठवाडा थंडीची लाट

कुलाबा वेधशाळेने विदर्भ, मराठवाडा पुढील ४८  तासात थंडी लाट असण्याची शक्यता वर्तविली आहे. गेल्या ४८  तासांपासून विदर्भात थंडीची लाट असून गुरुवारी रात्री  गोंदीयात निच्चांकी ७.८ अंश सेल्सिअस तापमानची तर नागपुरात ८.४ अंश सेल्सिअसपर्यंत  तापमानची नोंद झाली आहे. थंडीमुळे विदर्भात चांगलीच  हुडहुडी भरली आहे. 

दरम्यान थंडीच्या कडाक्यामुळे नागपुरात हुडकेश्वर परिसरात एकाला प्राणही गमवावे लागले आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुधाकर पिलपिले हे ६३ वर्षीय वयोवृद्ध बंद दुकानाजवळ बुधवारी सकाळी मृत अवस्थेत आढळले.