बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 डिसेंबर 2017 (08:53 IST)

वैद्य प.य.उर्फ दादा खाडीवाले यांचे निधन

पुण्यातील वैद्य प.य.उर्फ दादा खाडीवाले (८५) यांचे  वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची वैद्य खाडीवाले वैद्यक संशोधन संस्था आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य करते.त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव शनिवार पेठेतील औषध कारखान्यात ठेवण्यात आले आहे. 

वैद्य गेले ५० हुन अधिक वर्ष आरोग्य सेवेसाठी झटत आहेत. २०० प्रकारच्या आयुर्वेदिक पद्धती आणि त्याबद्दल माहिती सांगणारी १५० हुन अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने त्यांची राष्ट्रीय गुरू म्हणून निवड केली.