रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

प्रत्यक्षातला हल्क अवतरला

कॉमिक्स व अॅनिमेशन फिल्ममध्ये तुफान लोकप्रिय ठरलेले व आवढव्य शरीरयष्टीचे व अतिताकदवान हल्क हे कॅरेक्टर जनमानसात चांगलेच रुळले असताना या हल्कला लाजवील असा प्रत्यक्षातला हल्क इराणमध्ये असून साजाद गारीबी असे त्याचे नाव आहे. कॉमिक कॅरेक्टर हल्कपेक्षाही या हल्कला अधिक लोकप्रियता लाभली असून तो सोशल मीडियावर सेलिब्रिटी बनला आहे.
 
इराणमधील साजाद हा 26 वर्षीय तरुण लहानपणापासूनच धष्टपुष्ट आहे. त्याला अनुसरुन त्याने वे‍टलिफ्टिंग सुरु केले व त्यातूनच त्याला हल्कसारखे पिळदार शरीर मिळाले आहे. त्याची बॉडी पाहून अनेक लोकं त्याला घाबरतात. मा‍त्र मनाने तो खूपच साधा व शांत 
 
स्वभावाचा आहे. तो सांगतो बॉडी ब्लिडिंग व वेट लिफ्टिंग हेच आता त्याचे आयुष्य आहे. अर्थात त्याला अनेक अडचणींना सामाना करावा लागतो.
 
उदाहरण द्याचे तर तो कारमध्ये सहजी बसू शकत नाही. बसलाच तर उतरु शकत नाही. त्याचे वजन 155 किलो आहे व 180 किलो वेट तो उचलू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार त्याने नुकतीच इरार आर्मी जॉईन केली आहे. जगभरात त्याचे फॅन्स असून फेसबुक, ट्विटर, 
 
इंस्टाग्रामवर त्याचे 3 लाखांपेक्षा जास्त चाहते आहेत.