रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तू टिप्स 2018: नवीन वर्षात घरात करा हे बदल

प्रत्येक व्यक्ती नवीन वर्षाचे स्वागत लोकं उत्साहपूर्वक करतात आणि येणारा वर्ष भरभराटी देऊन जाईल अशी उमेदही असते. हे वर्ष आपल्या घरासाठी आणि कुटुंबासाठी सुखाचे जावे यासाठी सकारात्मक योजना आखाव्या लागतील. जरासे प्रयत्न आणि आणि संकल्प आपला नवीन वर्ष उत्साहाने भरून देईल. तर बघू काय लहानश्या वास्तू उपायाने घरात लक्ष्मीचा वास असू शकतो.
 
भीतींवरील तड्या, डाग, जाळे, तुटलेल्या खिडक्या आपल्या मनाला परावर्तित करतात. म्हणून हे सर्व दुरुस्त करवावे. सामर्थ्याप्रमाणे घरात पुताई करवावी.  
 
मुलांची शिक्षणात प्रगती व्हावी म्हणून पूर्व दिशा व्यवस्थित ठेवावी. मुलांच्या बेडरूममध्ये हत्ती, डायमंड, क्रिस्टल किंवा पांढर्‍या घोड्याचे चित्र लावावे.
 
स्वयंपाकघर हे घरातील महत्त्वाचा भाग असून येथे आग्नेय दिशा अर्थात पूर्व-दक्षिण कोपर्‍यात प्रज्वलित अग्नीचे चित्र, मंगल चिन्ह, मेणबत्ती किंवा अग्नी तत्त्वाचे प्रतीक त्रिकोण आकृती लावावी. या दिशेत लाल, पिवळा आणि नारंगी रंग वापरावा. 
 
रात्री झोप न येणे, अस्वस्थता, आजारामुळे त्रस्त असाल तर दक्षिण दिशा व्यवस्थित करा. दिशा सुधारण्यासाठी येथे गाय आणि बैल यांचे चित्र लावावे.
 
अनिद्रा, प्रेतआत्म्याची भीती किंवा वाईट स्वप्न येत असल्यास नैरृत्य दिशा अर्थात दक्षिण-पश्चिम कोपरा दुरुस्त करावा. किचनचे मुख्य दार येथे बनवणे योग्य नाही. हे स्थळ शुभ बनविण्यासाठी सिंहावर सवार देवी, मोठी मांजर किंवा सिंहाचे चित्र लावावे. व्हायलेट रंग वापरवा. तसेच बेडरूमला गुलाबी किंवा हलक्या रंगाची पुताई करवावी.
 
अस्वस्थता आणि दूरस्थ संपर्कात सुधार करण्यासाठी वायव्य कोण अर्थात उत्तर-पश्चिम दिशेला व्यवस्थित करावे. येथे बाथरूम किंवा गेस्ट रूम बनवावे. येथे अर्धचन्द्राकार चंद्राची फोटो लावावी. लाभदायी वार्तालाप हेतू या दिशेत टेलिफोन किंवा मोबाइल ठेवावी. हलके, सिल्वर टोन असलेले रंग योग्य ठरतील.
 
आरोग्याची किंवा कमाईची समस्या असल्यास उत्तर दिशेकडे लक्ष द्या. स्टोअर, लायब्ररी, ऑफिस किंवा मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी ही जागा योग्य आहे. येथे पूर्वजांचे फोटो मुळीच लावू नये. याजागेसाठी पिवळा रंग योग्य ठरेल.
 
घरात शांती आणि सुखद वातावरण राहावे यासाठी ईशान कोण अर्थात उत्तर-पूर्व दिशेकडे लक्ष असू द्या. या स्थळी मानसिक शांती मिळते. येथे वजनदार वस्तू ठेवू नये. येथे मुख्यद्वार भाग्यशाली राहील. याजागेवर सूर्य-चंद्राची आकृती किंवा सोने-चांदीच्या रंगाची आकृती लावला हवी. विंडचाइम्स लावण्यासाठीदेखील ही जागा योग्य ठरेल.