बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2018
Written By

अंक ज्योतिष 2018 राशिफल

अंक ज्योतिष्याचे 2018चे राशीफल तुमच्या मूलकांवर आधारित आहे. वर्ष 2018वर चंद्राचे आधिपत्य राहणार आहे. दुसर्‍या शब्दांमध्ये सांगितले तर वर्ष 2018 पूर्णपणे चंद्राच्या नियंत्रणात राहणार आहे. ज्योतिष्यामध्ये चंद्राचे विशेष महत्त्व आहे. हे वर्ष पूर्णपणे महिलांसाठी सशक्त राहणारा आहे, म्हणून महिलांना उंची गाठण्यासाठी कोणी रोखू शकत नाही. अंक शास्त्रानुसार रचनात्मक लोकांसाठी देखील हे वर्ष उत्तम जाणार आहे. तर मग जाणून घेऊ मूलांक 1 ते 9 पर्यंतच्या भविष्यवाणीबद्दल काय सांगतो आमचे भविष्यफल. 
मूलांक 1चे राशीफल  
मूलांक 1 : अंक ज्योतिष्यानुसार मूलांक 1 असणार्‍या जातकांसाठी हा संपूर्ण वर्ष फारच उत्तम जाणार आहे, म्हणून जर तुम्ही काही नवीन करायचा विचार करत असाल तर या वर्षी सुरू करू शकता. या दरम्यान तुम्ही स्वत:ला फारच रचनात्मक आणि सशक्त अनुभवाल. कामाच्या प्रती तुमचे समर्पण आणि मेहनतीमुळे तुमची प्रशंसा होईल. आई वडिलांचा आशीर्वाद आणि सहयोग मिळेल. बर्‍याच वर्षांच्या मेहनतीनंतर तुम्हाला हे प्राप्त होईल. तसेच जोडीदारासोबत तुम्ही वेळ घालवाल, आणि त्यांची मदत देखील मिळेल. स्त्रिया तुमच्यासाठी या वर्षी देवदूताप्रमाणे सिद्ध होतील, कारण वर्ष 2018च्या प्रत्येक वळणावर त्या तुमच्यासाठी उभ्या राहणार आहे. कुटुंबात आनंदासाठी लोकांशी मिसळून राहणे गरजेचे आहे. अभ्यासात मुलांचे प्रदर्शन अपेक्षांहून जास्त उत्तम राहणार आहे, हेच तुमच्यासाठी आनंदाची बाब राहणार आहे. या दरम्यान तुमच्या मनात आध्यात्मिक विचार येतील. तसेच जोडप्यांसाठी हे वर्ष फारच छान जाणार आहे. साल 2018मध्ये ते एक मेकसोबत उत्तम वेळ घालवतील. जर तुमच्या मनाला एखादे पटले तर त्याला तुम्ही प्रपोज करू शकतात. स्टार्स पूर्णपणे तुमच्याकडून आहे. एकूण असे म्हणू शकतो की हे वर्ष मूलांक 1च्या जातकांसाठीच येत आहे.  
 

मूलांक 2चे भविष्यफल
मूलांक 2 : मूलांक 2च्या जातकांसाठी हे वर्ष बरेच काही घेऊन येत आहे. मूलांक 2च्या जातकांमध्ये बरेच सकारात्मक बदल बघायला मिळतात. व्यवसाय आणि वैयक्तिक दोन्ही जीवन शानदार राहणार आहे. वर्ष 2018मध्ये भाग्य देखील तुमचा साथ देईल, पूर्ण वर्ष पैशांची आवक राहणार आहे. जर तुम्ही डेयरी, मोती किंवा आर्टचा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला फायदा होईल. कलात्मक लोकांसाठी देखील वर्ष 2018 उत्तम जाणार आहे. वर्ष 2018मध्ये तुम्हाला त्या सर्व गोष्टी मिळणार आहे ज्या तुम्हाला हव्या होत्या. बर्‍याच बाबतीत तुम्हाला आईचा सहयोग मिळेल जे तुम्हाला एखाद्या चमत्कारासारखा जाणवेल. मूलक 2च्या जातकांच्या कुटुंबीयांसाठी हे वर्ष फारच उत्तम जाणार आहे. अंक शास्त्रानुसार विवाहित लोक संपूर्ण वर्ष आनंद आणि प्रेमाने राहणार आहे. प्रेम संबंधांमध्ये मधुरता येईल. या वर्षी तुमची रचनात्मकताच तुमच्या यशाचे कारण राहणार आहे. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर ते या वर्षी उत्तम राहणार आहे पण खाण्यापिण्यावर लक्ष द्यावे लागणार आहे. एकूण आम्ही म्हणू शकतो की हे वर्ष मुलांक 2च्या जातकांनाच समर्पित आहे. 

मूलांक 3चे भविष्यकथन
मूलांक 3 : अंक शास्त्रानुसार मुलांक 3 च्या जातकांसाठी हे वर्ष सामान्य राहणार आहे. तुमच्यासाठी या वर्षी काही खास होणार नाही आहे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रयत्न करणे सोडून द्यायला पाहिजे. तुम्ही तुमच्या बळावर प्रयत्न करू शकता. वर्ष 2018च्या सुरुवातीत तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे काळजीत पडू शकता, पण परिस्थितीत लवकरच सुधारणा येईल. तुम्ही जेवढी मेहनत कराल तुम्हाला त्याचे परिणाम देखील तेवढेच चांगले मिळतील. तुम्ही तुमचे सर्व काम सोप्यारित्या पूर्ण कराल. वर्ष 2018मध्ये तुम्हाला बरेच चढ उतारांचा सामना करावा लागणार आहे. या दरम्यान तुम्ही तुमच्या योग्यतेनुसार परिणाम मिळवाल. तुमच्या व्यक्तित्वात आणि चरित्रात सुधारणा होईल. आर्थिक स्थितीबद्दल बोललो तर तुम्हाला काही चांगले रिझल्ट्स मिळणार आहे. या वर्षी समाजातील लोकांसोबत तुमचे नाते अधिक चांगले होतील. परिवारात आनंदाचे वातावरण राहणार आहे आणि संपूर्ण वर्ष तुम्ही मुलांसोबत आनंदाने वेळ घालवाल. वर्ष 2018मध्ये तुम्ही दान पुण्य देखील कराल आणि तुमच्या उदार स्वभावामुळे लोक तुमची प्रशंसा करतील. आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष उत्तम जाणार आहे. शेवटी म्हणू शकतो की हे वर्ष भले औसत राहिले तरी मेहनतीमुळे तुम्ही सुखद परिणाम प्राप्त करू शकता.
मूलाकं 4चे भविष्यकथन
4च्या जातकांना या वर्षात बर्‍याच आव्हानांना पुढे जावे लागणार आहे, पण तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी आणि मेहनतीच्या बळावर या आव्हानांवर विजय मिळवाल. आपल्या मेहनतीमुळे तुम्ही तुमचे लक्ष्य पूर्ण कराल. व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनात काही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, पण तुम्ही निराश न होता स्वविवेकाने पढे जाल. महत्त्वपूर्ण कामांना तुम्ही फारच सोप्यारित्याने पूर्ण कराल. संपूर्ण वर्ष तुम्हाला नकारात्मक वस्तूंपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मानसिक रूपेण तुम्ही थोडे असहज होऊ शकता. याचे निदान करण्यासाठी तुम्ही योग आणि ध्यानाचा सहारा घ्या. तसेच उत्तम आरोग्यासाठी व्यायाम देखील करा. मग परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही सकारात्मक राहा. घरगुती प्रकरणात तुम्हाला मिश्रित परिणाम बघायला मिळतील. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्यात एकाग्रतेची कमी येऊ शकते. तुम्ही अभ्यासात काही खास करू शकणार नाही. म्हणून भटकण्यापेक्षा चांगले आहे की तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या. तसे तर वर्ष 2018 तुमच्यासाठी सामान्य आहे, पण तुम्हाला सकारात्मक ऊर्जेसोबत पुढे जायचे आहे.

मूलाकं 5चे भविष्यकथन
मूलांक 5 च्या जातकांसाठी वर्ष 2018 संमिश्र परिणाम देणारे ठरणार आहे. या वर्षी बर्‍याच आव्हानांना समोर जायचे आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या स्वभाव आणि विचारांवर जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. कार्य स्थळावर वाद विवाद होण्याची शक्यता आहे, तर सावधगिरी बाळगणे फारच गरजेचे आहे. तसेच तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. मित्र आणि लोकांशी बोलताना विचार करून बोला. तुम्ही तुमच्या सकारात्मक स्वभावामुळे कॅरियरची नवी उंची गाठाल. वित्त संबंधी प्रकरणात सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संपूर्ण वर्ष पैशांचे आगमन होत राहणार आहे, पण खर्चांवर लगाम   लावण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी वर्गाला उत्तम परिणाम मिळवण्यासाठी फार मेहनत करावी लागणार आहे. तुम्ही शांत राहा आणि आत्मविश्वासाने पुढे जा.
  
मूलाकं 6चे भविष्यकथन
मूलांक 6 : अंक ज्योतिषानुसार यश मिळविण्यासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागणार आहे. तसे तर परिस्थिती हळू हळू बदलेल पण भाग्याचा साथ असल्याने तुम्हाला घाबरण्यासारखे काहीच नाही. या वर्षी तुम्ही चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव घ्याल. या दरम्यान तुम्हाला चांगली संधी देखील येईल. पण त्याचा फायदा घेण्यासाठी फार मेहनत करावी लागणार आहे. आरोग्याची काळजी घ्या, तसेच आईच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे. काही अडचणींमुळे तुम्ही तणावात येऊ शकता ज्यामुळे तुमचे मन कामात लागणार नाही. पण तुमच्या आशावादी विचारांमुळे पुढे जाल. वैवाहिक जीवनासाठी पारस्परिक समज होणे फारच गरजेचे आहे आणि यशस्वी वैवाहिक जीवनाचे हेच रहस्य आहे. तसेच नात्यांमध्ये ट्रास्परंसी असायला पाहिजे. जो पर्यंत प्रेम संबंधांचा प्रश्न आहे तर वर्ष 2018 यासाठी काही खास नाही आहे. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो. एक मेकवर आरोप लावू नये, नाहीतर संबंध नेहमीसाठी खराब होऊ शकतात. सकारात्मक परिणामासाठी सकारात्मक धोरणाचे पालन करावे. तसेच प्रगतीसाठी तुम्ही अंक ज्योतिषाच्या आधारावर नावात सुधारणा करू शकता.
मूलाकं 7चे भविष्यकथन
7 मूलकांच्या जातकांसाठी वर्ष 2018 सुख आणि भरभराटी घेऊन येईल. या वर्षी अनेक सोनेरी क्षण आपली वाट बघत आहे. पूर्वी केलेल्या कार्यांचे आनंददायी परिणाम आपल्याला मिळतील. आपल्या आविष्यात काही मोठे बदल घडतील आणि आपल्याला अपेक्षित परिणाम हाती लागतील. कार्य-स्थळी आपल्याला अनपेक्षित नफा होईल. नोकरीत असल्यास पदोन्नती आणि पगारवाढ होईल. तरी आपल्याला आपल्या वित्तीय स्थितीकडे लक्ष देण्याची गरज आहे. गृहस्थ जीवनासाठी 2018 हे वर्ष उत्तम आहे. कुटुंबात प्रेम आणि सुखाचे वातावरण राहील. घरात मांगलिक कार्याचे आयोजन होईल. या दरम्यान काही नवीन शिकण्याची संधी मिळेल. अध्यात्माकडे किंवा गुप्त विद्येकडे कळ असेल. आजी-आजोबांकडून मदत मिळेल. त्यांचा सल्ला फायद्याचा ठरेल. एकूण 2018 मध्ये  जवळीक वातावरण सकारात्मक राहील.
 
मूलाकं 8चे भविष्यकथन 
2018 या वर्षात मूलांक 8 च्या जातकांना अनेक आव्हानांना सामोरा जाण्यासाठी तयार राहवे लागेल. आपल्या यशात अनेक अडथळे निर्माण होतील. अश्या परिस्थितींमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. हे आव्हाने पूर्वी केलेल्या कामांमुळे उद्भवतील. अनेक गोष्टी आपल्या अनुरूप नसणार. अनेक अडथळे निर्माण होतील म्हणून प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे योग्य ठरेल. वेळेवर कार्य पूर्ण होत नसल्याने जीवनात अडचणींना सामोरा जावे लागेल. आपण विद्यार्थी असल्यास अभ्यासात अडथळे येतील आणि एकाग्रतेचा अभाव राहील. घरगुती प्रकरणात सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्या पार्टनरवर विनाकारण शंका घेणे टाळा. आपल्या रचनात्मक कामांमध्येदेखील अडथळे निर्माण होऊ शकतात. आरोग्याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. चुकीची जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. 2018 आव्हान देणारा 
असल्यामुळे सकारात्मक विचारांची गरज आहे कारण जीवनात चांगला आणि वाईट दोन्ही घडत असतं. सर्व समस्यांना कोपर्‍यात ठेवून लक्षावर फोकस करण्याची गरज आहे. सकारात्मक वृत्ती आणि धैर्य धरून पुढे वाढत चला. सर्व व्यावसायिक आणि खाजगी समस्या सुटतील.

मूलाकं 9चे भविष्यकथन
मूलांक 9 च्या जातकांसाठी हे वर्ष एखाद्या बक्षिसाप्रमाणे आहे. वर्ष 2018 यात आपल्या आविष्यात अनेक चांगले बदल घडतील. आपल्या यशाला एक नवीन मुक्काम मिळेल आणि मिळकतीचे नवीन स्रोत सापडतील. कार्य-स्थळावर आपले प्रदर्शन प्रशंसनीय असेल. आपल्या रचनात्मक कार्य आणि मेहनत सीनियरवर प्रभाव सोडेल. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. प्रभावशाली लोकांसाठी तर वर्ष 2018 प्रत्येक बाबतीत शानदार आहे, विशेषतः राजकारणी लोकांसाठी. क्रीडापटूंसाठी हे वर्ष उत्तम ठरेल. गृहस्थ जीवनात आनंदी वातावरण राहील. कुटुंबाचा पूर्णपणे सहयोग मिळेल. आपल्या आवडीच्या मंडळीसोबत वेळ घालवाल ज्याने ताण कमी होईल. अभ्यासात मुलांचा प्रदर्शन उत्तम राहील. आरोग्यदृष्ट्यादेखील 2018 हे वर्ष उत्तम ठरेल. योग आणि व्यायाम आरोग्यासाठी उत्तम ठरेल. तर तयार राहा कारण नवीन वर्ष आपल्यासाठी अनेक सोनेरी संधी घेऊन येत आहे.