बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2018
Written By

वैदिक ज्योतिषावर आधारित 2018चे राशीफल

एकदा आम्ही परत तुमच्यासाठी आणले आहे “राशिफल 2018”,जे वैदिक ज्योतिषावर आधारित आहे. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहे की येणारे नवीन वर्ष अर्थात 2018 तुमच्यासाठी काय नवीन आणणार आहे. तसेच या भविष्यवाणीद्वारे आम्ही तुमच्या जीवनातील काही विषयांवर देखील चर्चा करू, जसे पारिवारिक जीवन कसे राहील, आर्थिक जीवनात काय बदल होईल, खरे प्रेम मिळणार आहे की नाही, अभ्यासात यश मिळेल का, नोकरी व्यवसाय कसा चालेल. तर बघूया नवीन वर्ष 2018 तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे?
 
मेष राशिफल 2018
मेष राशीच्या जातकांसाठी 2018च्या भविष्यवाणीबद्दल सांगायचे झाले तर जोडीदारासोबतचे नाते संपूर्ण वर्षभर आनंदाचे राहणार आहे. निवास स्थानात बदल होण्याची शक्यता आहे किंवा घराला पेंट करवू शकता. काही जातकांच्या व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे अर्थात ते नोकरीत बदल करतील. आर्थिक आणि सामाजिक थोरावर तुमचा विकास होईल. वडील आणि घरातील मोठ्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे फारच गरजेचे आहे. आईबद्दल बोलायचे झाले तर तिला शांततेची गरज राहणार आहे, कारण भावनात्मक तणावामुळे ती थोडी परेशान राहू शकते. मेष राशीच्या काही जातकांची आवड धार्मिक आणि प्राच्य शास्त्रांच्या अध्ययनाकडे राहणार आहे, तसेच काही लोक आध्यात्मिक कार्यांमध्ये स्वत:ला व्यस्त ठेवणे पसंत करतील. दीर्घकालीन प्रवासाचा योग घडून येत आहे. काही लोक कामाच्या निमित्त प्रवास करतील आणि काही लोक एकांतात वेळ घालवण्यासाठी लांबचा प्रवास करतील.
 
उपाय: या वर्षी उपाय म्हणून महादेवाची आराधना केल्याने जीवन मंगल होईल आणि उत्तम परिणामाची प्राप्ती होईल.

वृषभ वार्षिक राशिफल 2018
 
सारांश: राशिफल 2018नुसार वृषभ राशीच्या जातकांना या वर्षी काही चढ उतार बघावे लागणार आहे. पारिवारिक जीवनात विवाद होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्ही मानसिकरीत्या त्रस्त राहू शकता. कुटुंबात वडिलांसोबत तणावपूर्ण संबंधांचा अनुभव जाणवेल तर कार्यस्थळात बॉसशी देखील विवाद होऊ शकतो. वर्तमान कार्यालय किंवा जॉबमुळे असंतुष्ट होऊन तुम्ही जॉब चेंज करण्याचा प्लान करू शकता. भविष्यफलानुसार काही चांगल्या संधी तुम्हाला जरूर मिळतील. तुम्ही तुमचे साहस, प्रयास व कार्यांमध्ये बढती अनुभवाल. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे पण दुसरीकडे तुमचे खर्चे देखील वाढतील. म्हणून या वर्षी एक चांगल्या वित्तीय नियोजनाचे पालन केले पाहिजे. जोखीमीचे गुंतवणूक करू नये. जर तुम्हाला गुंतवणूक करायचे असेल तर त्यावर थोडे विचार करून पूर्ण रिसर्च नक्की करावे. आरोग्याच्या बाबतीत या वर्षी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्या निष्काळजीपणामुळे आरोग्य विषयक गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. स्वस्थ आहार व जीवनशैलीचा प्रयोग करावा. त्यासोबतच व्यायाम, योगा व ध्यान इत्यादीच्या माध्यमाने फिटनेसवर देखील लक्ष द्या. भविष्यावाणी 2018 नुसार या वर्षी लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये तणाव राहण्याची शक्यता आहे. नाते तुटू नये म्हणून सांभाळून ठेवा आणि वाणीवर संयम ठेवावे. आपले जोडीदार किंवा लव्ह पार्टनरसोबत बोलताना रागावर नियंत्रण ठेवणे फारच गरजेचे आहे. कोर्ट कचेरी किंवा कायदेविषयक प्रकरणात निकाल तुमच्या बाजूने लागेल.
 
उपाय: रोज लक्ष्मीची पूजा करावी आणि आपल्या कुटुंबातील स्त्रियांना सिल्कचे वस्त्र दान करावे.
मिथुन वार्षिक राशिफल 2018
सारांश: राशिफल 2018नुसार मिथुन राशीच्या जातकांसाठी हे वर्ष सामान्य जाणार आहे. जर तुमच्या आर्थिक जीवनावर दृष्टी टाकली तर तुमच्या खर्चात वाढ होणार आहे. तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा तुमच्या समोर आर्थिक समस्या देखील येऊ शकतात. जर जातकाचे लग्न झालेले असेल तर जोडीदाराच्या मदतीमुळे तुमचे आर्थिक पक्ष मजबूत होतील. तसेच तुम्हाला पारिवारिक जीवनात देखील आव्हानांना समोर जावे लागणार आहे. घरात अशांतीचे वातावरण राहणार आहे ज्यामुळे मानसिक ताण जाणवेल. एखाद्या विवादामुळे परिवारासोबत वैमनस्याची स्थिती येईल. जर तुम्हाला या परिस्थितीत सुधारणा करायची असेल तर  तुम्हाला फारच चांगल्या पद्धतीने समस्यांचे निराकरण करावे लागणार आहे. ग्रहांची दशा सांगत आहे की विद्यार्थी वर्गासाठी हे वर्ष उत्तम जाण्याची शक्यता आहे. परीक्षा क्षेत्रात तुम्ही यशस्वीरीत्या प्रदर्शन कराल. परदेशात उच्च शिक्षा प्राप्त करत असणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण होण्याचे शुभ संकेत मिळत आहे. व्यापारी वर्गाला आपल्या बिझनेस पार्टनरसोबत तालमेल बसवून चालावे लागणार आहे. यामुळे तुमच्या व्यापारात सकारात्मक भाव निर्माण होईल. जर तुम्ही तुमच्या व्यवसायात विस्तार करण्याचा विचार करत असाल‍ किंवा नवीन व्यापार सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपल्या या विचारांवर थोडा लगाम लावा आणि योग्य वेळ येण्याची वाट बघा, पण या वेळेस तुम्ही सध्याच्या व्यापारावर आपले ध्यान केंद्रित करा. फलादेश 2018नुसार कलाकार, कलात्मक लेखक आणि प्रोफेशनल डिझायनर्ससाठी वेळ फारच अनुकूल आहे. यात तुमचे करियर खुप चमकेल. या क्षेत्रात एखाद्या लहान गोष्टींमुळे गैरसमज झाल्याने संवादांचे अभाव पैदा होण्याची शक्यता आहे जी तुमच्यासाठी शुभ नसेल.  
 
उपाय: विष्णूची आराधना करा आणि निर्धन छात्रांना वह्या, पुस्तक इत्यादी वस्तूंचे दान करा. असे करणे तुमच्यासाठी फारच शुभकारी ठरणार आहे.


कर्क वार्षिक राशिफल 2018
 
सारांश: राशिफल 2018नुसार या वर्षी कर्क राशीच्या जातकांना आपल्या वैयक्तिक आणि वैवाहिक संबंधांवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. या वर्षी जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे, ज्याचे वेळ राहता निराकरण नाही केले तर हे नुकसानदायक ठरू शकत. या दरम्यान काही विवाहित लोकांचे जोडीदारासोबत अलगाव देखील होण्याची शक्यता आहे. तसेच दुसरीकडे या विपरित स्थितीत तुम्हाला कुटुंबीयांचे प्रेम आणि साथ मिळेल. आई वडील मध्ये पडल्याने तुमच्या जीवनात सुधारणा होईल. हे वर्ष कुटुंबीयांसाठी चांगले आहे. या वर्षी नवीन घर विकत घेण्याची शक्यता आहे. त्याशिवाय तुम्ही घरातील मरम्मत किंवा सौंदर्यीकरणाचे काम करवू शकता. तुमचे ग्रह सांगत आहे की या वर्षी व्यापार करणार्‍या जातकांना लाभ मिळणार आहे आणि परदेशातील संपर्क वाढतील, पण व्यवसायात कुठल्याही प्रकारची पार्टनरशिप करण्याअगोदर विचार करणे फारच आवश्यक आहे. कर्क राशीचे जातक जर नोकरी करत असतील तर त्यांना या वर्षी चांगले यश मिळेल. विरोधी कमजोर पडतील. बाकी या वर्षी आरोग्य उत्तम राहणार आहे. मनोवैज्ञानिक, भाषा विज्ञानी आणि अनुवादकांसाठी हे वर्ष चांगले जाणार आहे. हे लोक आपल्या कार्यक्षेत्रांमध्ये चांगली प्रगती करतील. त्याशिवाय रियल इस्टेट आणि शैक्षणिक संस्थेत कार्यरत जातकांसाठी देखील हा वेळ चांगला जाणार आहे. वर्ष 2018मध्ये आर्थिक प्रकरणाबद्दल थोडे सावध राहणे गरजेचे आहे. तुमचे उत्पन्न चांगले राहतील पण वायफळ खर्चांमुळे तुम्ही बचत करू शकणार नाही. 
 
उपाय: दुर्गेची नियमित आराधना आणि दुर्गा कवचच्या स्थापनेमुळे भाग्य वृद्धी होईल आणि जीवनात शांती व समृद्धी येईल.
सिंह वार्षिक राशिफल 2018
सारांश: राशिफल 2018नुसार सिंह राशीच्या जातकांसाठी हे वर्ष व्यक्तिगत आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारे चांगले जाणार आहे. संतानं पक्षाकडून मिळणार्‍या त्रासामुळे तुम्हाला थोडी काळजी वाटणार आहे. आपल्या उमेदीप्रमाणे प्रदर्शन नाही झाल्याने मुलांसोबत तुमचे वाद विवाद होतील. म्हणून त्यांच्यासोबत प्रेमाने वागा आणि त्यांची काळजी घ्या. दुसरीकडे भाऊ बहिणींसाठी हे वर्ष फारच प्रगतिशील राहणार आहे, त्यांच्यासोबत संबंध चांगले राहतील. जर तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल विचार केला तर जोडीदारासोबत भावनात्मक सहयोग मिळेल आणि त्यामुळे तुमचे संबंध अधिक घट्ट होतील. तुमच्या कुटुंबीयांचे जीवन देखील सुखमय व्यतीत होतील. भविष्यकथन 2018 असे सांगत आहे की, उत्पन्न चांगला असल्यामुळे या वर्षी तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे. मोठा वित्तीय लाभ आणि धनार्जन होण्याची प्रबल शक्यता आहे. कार्य स्थळावर तुम्ही फार चांगले काम कराल आणि तुम्हाला उत्तम प्रदर्शनासाठी सन्मानित करण्यात येईल. जे जातक व्यवसाय करत आहे त्यांना गुंतवणूक केल्याने फायदा होण्याची शक्यता आहे. काही लोक या वर्षी विदेश यात्रावर देखील जाऊ शकतात. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला चांगले नंबर मिळवण्यासाठी फार मेहनत करावी लागणार आहे. जास्त काम असल्यामुळे किंवा इतर कुठल्या दबावामुळे तुम्हाला अशांती, बेचैनी आणि अनिद्राची समस्या राहू शकते. म्हणून जास्त ताण घेऊ नका आणि आराम करा. तुम्ही योगा, प्राणायाम आणि आध्यात्मिक चिंतन करा.  
 
उपाय: रुद्र पूजा आणि रुद्रमचे उच्चारण केल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.

कन्या वार्षिक राशिफल 2018
सारांश: राशिफल 2018नुसार हे वर्ष कन्या राशीच्या जातकांसाठी फारच खास आणि मनोरंजक राहणार आहे. आधी केलेल्या कठीण परिश्रमाचे उत्तम परिणाम मिळतील आणि तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. तुमच्या व्यक्तिगत आणि पारिवारिक उत्पन्नात वाढ होईल. या वर्षी तुम्हाला तुमचे भाग्य चमकवण्यासाठी बरीच संधी मिळेल. आरोग्याच्या बाबतीत ह्या वर्षी थोडे सांभाळून चालावे लागणार आहे. कार्य क्षेत्रात या वर्षी तुम्हाला तुमच्या चांगल्या प्रदर्शनामुळे प्रशंसा आणि बढती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अफसरांकडून तुम्हाला सहयोग मिळेल जे तुमच्यासाठी फारच फायदेशीर ठरणार आहे. जे जातक इलेक्ट्रिक उपकरणांचा व्यवसाय करत आहे त्यांना यश मिळेल. त्याशिवाय सांख्यिकी आणि सॉफ्टवेयर प्रोफेशनल्सचे करियर देखील 
चमकेल. या अवधीत जमीन किंवा प्रॉपर्टी विकत घेण्याची शक्यता आहे. या वर्षी कुठल्याही प्रकाराचे लोन घेण्यापासून स्वत:चा बचाव करा अन्यथा तुम्ही अडचणीत पडू शकता. मुलांशी व्यवहार करताना थोडी सावधगिरी बाळगा. कारण मतभेद झाल्यामुळे संबंधांवर त्याचा प्रभाव पडू शकतो. म्हणून कठिण परिस्थितीमध्ये धैर्याने काम घ्या. या वर्षी मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.  
 
उपाय: गणेश आणि लक्ष्मीची आराधना केल्याने सौभाग्याची प्राप्ती होईल.
तूळ वार्षिक राशिफल 2018
भविष्यफल 2018 प्रमाणे तूळ राशीच्या जातकांसाठी हे वर्ष आनंदी जाणार आहे. या दरम्यान आपल्यात साहस, शूरपणा आणि प्रयत्नात वाढ करण्याची गरज आहे. व्यवसाय वृद्धीसाठी हे वेळ उत्तम आहे. लोनसाठी अर्जी दिली असल्यास सकारात्मक परिणाम समोर येतील. शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने लाभ मिळेल. नोकरीत असणार्‍यांना या वर्षी अधिक प्रवास घडणार आहे. आपल्या सीनियर्स आणि साथीदारांसोबत चांगले संबंध स्थापित करून ठेवण्याचा सल्ला आहे. आर्थिक पक्षाची स्थिती अशी राहील की कमाईही खूप होईल आणि खर्चही. स्वत:वर आणि कुटुंबातील लोकांवर खूप खर्च कराल. खर्चांवर नियंत्रण ठेवावे नाहीतर समस्या उद्भवू शकतात. तसेच आपण घर बदलण्याबाबत विचार करत असाल तर हे वर्ष योग्य ठरेल. आपल्या आईसाठी हे वर्ष कठिण असू शकतं म्हणून प्रेम आणि काळजीने तिला सावरण्याचा प्रयत्न करा. घरात शुभ कार्य घडेल. मांगलिक कार्य किंवा नवीन पाहुण्याची चाहूल लागेल. एकूण हे वर्ष आपल्यासाठी शुभ फल देणारे सिद्ध होईल.
 
उपाय: दररोज संध्याकाळी लक्ष्मी-नारायणाची पूजा केल्याने नशीब उजळ होईल.

वृश्चिक वार्षिक राशिफल 2018
भविष्यफल 2018 प्रमाणे वृश्चिक राशीच्या जातकांना आर्थिक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. आर्थिक दृष्ट्या हे वर्ष विशेष नसणार, खर्चात वृद्धी होईल. अधिक खर्चामुळे कुटुंबातील मिळकत आधीपेक्षा कमी होईल. पूर्ण वर्ष कमाई कमी आणि खर्च अधिक राहणार आहे म्हणून काळजी बाळगा. याव्यतिरिक्त आपल्या वाणीवर नियंत्रण असू द्या. आपल्या मुखातून निघणारे चुकीचे आणि कटू शब्द दुसर्‍यांना टोचू शकतात. सर्वांसोबत प्रेम आणि दयाभावाने वागा. कारण व्यवहारात बदल केल्याने फायदा मिळू शकतो. वडील आणि कुटुंबातील वरिष्ठ लोकांसोबत गांभीर्याने वागा आणि त्यांना सन्मान द्या. गैरसमज असल्यास पटकन दूर करण्याचा प्रयत्न करा. मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे विशेषकरून त्याची संगतकडे लक्ष असू द्या. मुलांबाबतीत बेर्पवाही भविष्यात महाग पडेल. या वर्षी कामासंबंधी लहान-सहान प्रवास घडू शकतात. जीवनाचे सत्य शोधण्याच्या फेराक मध्ये धार्मिक स्थळाकडे कळ असू शकतो. आरोग्य उत्तम राहील आणि आपल्या साहस आणि आत्मविश्वासात मजबुती येईल. आध्यात्मिक व धार्मिक कामात रुची वाढेल.
 
उपाय: भाग्योदयासाठी गरीब आणि गरजू लोकांना भोजन द्या आणि घर- घरात कामास येणारी सामुग्री दान करा.
धनू वार्षिक राशिफल 2018
धनू राशीच्या जातकांसाठी या वर्षी आर्थिक स्थिती उत्तम राहील. या दरम्यान आपण ऐशो आरामाचे जीवन व्यतीत कराल. आपण आपली कमाई लाँग टर्म साठी गुंतवून द्या ज्याने नफा होईल. या वर्षी केलेल्या सर्व गुंतवणूक लाभदायक सिद्ध होतील. व्यावसायिक जीवनात समृद्धी येईल आणि आपल्याला मेहनतीचे फळ मिळेल. कौटुंबिक जीवनात चढ- उतार येत राहतील. जीवन साथीदारासोबत संबंध बिघडू शकतात आणि आपसात मतभेद असल्यामुळे वाद निर्माण होऊ शकतात. यावर उघडपणे चर्चा करून तसेच कुटुंबातील वडिलधार्‍यांना मध्यस्थी ठेवल्याने समस्या सुटतील. या व्यतिरिक्त भाऊ-बहीण आणि कुटुंबातील इतर सदस्यांप्रती आपला सकारात्मक व्यवहाराने घरात सुख नांदेल. विद्यार्थी चांगले प्रदर्शन करतील. आपल्याला आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. गैरवर्तन आणि कडू बोलामुळे गैरसमज आणि ताण निर्माण होऊ शकतो. जास्त ताण घेऊन काम करू नये कारण पूर्णपणे पोषण न मिळाल्याने आपण मानसिक कमजोरीने पीडित राहू शकता. एकूण धनू राशीसाठी वेळ शुभ आहे.
 
उपाय: योग व ध्यान केल्याने लाभ मिळेल.

मकर वार्षिक राशिफल 2018
मकर राशीच्या जातकांसाठी 2018 हे वर्ष सामान्य राहील. जीवनातील भिन्न क्षेत्रात चढ-उतार बघावे लागतील. आपल्या प्रोफेशन जीवनात चांगले अनुभव येतील. कार्यक्षेत्रात प्रदर्शन उत्तम राहील आणि आपले सीनियर आपल्या कामाचे कौतुक करतील. उत्तम प्रदर्शनामुळे पदोन्नती आणि वेतन वृद्धीचे योग बनतील. आपल्या सीनियर्सचा सन्मान करा आणि त्यांच्यासोबत चांगले संबंध स्थापित करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायी बंधूंसाठी हे वर्ष फायद्याचं ठरेल. आर्थिक लाभाचे योग आहे. कार्यक्षेत्रासह कुटंबातदेखील सुख-शांतीचे वातावरण राहील. आपल्याला कार्य आणि व्यवसायासंबंधी प्रवास करावे लागू शकतात. खाजगी जीवनात लहान-सहान आव्हाने स्वीकारावे लागतील. घरात मांगलिक कार्याचे योग बनत आहे. अध्यात्म सारख्या गंभीर विषयाकडे कळ असू शकेल. आर्थिक लाभ मिळण्याचे योग आहे. या वर्षी प्रॉपर्टीत गुंतवणूक किंवा इतर कंपनीत गुंतवणूक केल्याचे चांगले परिणाम दिसून येतील. तरी आर्थिक प्रकरणात प्रत्येकावर विश्वास ठेवणं धोकादायक सिद्ध ठरू शकतं म्हणून कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आपल्या अनेक समस्या आपोआप सुटतील परंतू हातावर हात धरून बसणे असा अर्थ काढू नये. आरोग्य दृष्ट्या हे वर्ष उत्तम राहील. फिट राहण्यासाठी नियमित व्यायाम करा.
 
उपाय: दान-पुण्य केल्याने आपल्या या वर्षी उत्तम परिणाम प्राप्त होतील.
कुंभ वार्षिक राशिफल 2018
राशिफल 2018 नुसार हे वर्ष आपल्या व्यक्तिमत्त्व आणि व्यवसायासाठी उत्तम ठरेल. आपण जलद गतीने यश मिळवाल आणि आपले सर्व काम लवकरच पूर्ण होतील. ऑफिस किंवा कार्यस्थळी आपल्या प्रयत्नांचे कौतुक केले जाईल. या वर्षी आपले शत्रू कमजोर पडतील. हा काळ वडील आणि भावंडासाठीही उत्तम ठरेल. कुटुंबातील व्यवसायात मोठ्या फायद्याचे योग आहे आणि ही वेळ नवीन प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी खूप चांगले आहे. शेअर बाजारात गुंतवणूक आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. याव्यतिरिक्त अध्यात्माकडे कळ राहील. आर्थिक स्थिती सुधारेल विशेष म्हणजे उधारी किंवा कर्ज फिटेल. कामामुळे परदेश प्रवासाचे योग बनत आहे, निश्चितच हा प्रवास आपल्यासाठी फायद्याचा ठरेल. आपले मुलं प्रोफेशनल असो किंवा शैक्षणिक दोन्ही क्षेत्रात उत्तम प्रदर्शन करतील. भविष्यफल 2018 नुसार कुंभ राशीचे परदेशी शिक्षण घेऊ इच्छित विद्यार्थ्यांना यश मिळेल. या वर्षी आरोग्यही उत्तम राहील परंतू दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकतं. एकूण 2018 आपल्यासाठी उन्नती देणारा ठरेल. या दरम्यान अनेक सोनेरी क्षण येतील.
 
उपाय: गणपतीची आराधना करावी तसेच दान-पुण्यही करावे.

मीन वार्षिक राशिफल 2018
मीन राशीच्या जातकांच्या जीवनशैलीत 2018 मध्ये काही अनपेक्षित बदल होईल. यासोबतच खाजगी आणि व्यावसायिक जीवनात बरेच बदल होण्याची शक्यता आहे. या काळात आपल्या अधिक मेहनत घेण्याची गरज आहे परंतू घाबरून जाऊ नका, या मेहनतीचे फळ निश्चित गोड असणार. कामामुळे प्रवास घडेल. मुलांची साथ न मिळाल्याने समस्या उद्भवू शकते, म्हणून त्याच्यांसोबत वेळ घालवण्याची गरज आहे. सुरुवातीलाच दुर्लक्ष केले तर नंतर स्थिती गंभीर होऊ शकते. दांपत्या जीवनात सावध राहण्याची गरज आहे तसे धैर्य आणि प्रेमाने हृदय जिंकणे काही कठिण नाही. सट्टा आणि अश्या प्रकाराच्या आर्थिक बाबतीत गुंतवणूकपासून लांब राहा. अनुभवी लोकांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करणे योग्य ठरेल. मन शांत आणि ताजेतवाने राहावे यासाठी योग आणि ध्यान करावे. आपण वडिलोपार्जित मालमत्ते वारस बनू शकतात तसेच अनेक लोकांसोबत सामायिक व्यवसाय लाभप्रद ठरेल. याव्यतिरिक्त आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. वडिलधारी लोकं आणि प्रियजनांची काळजी घ्यावी. घरात नियमित रूपाने पूजा-पाठ करणे आवश्यक आहे. नवग्रह शांती, हवन आणि मंदिरात अभिषेक करवणेदेखील आपल्यासाठी लाभदायक ठरेल.
 
उपाय: घरी नवग्रह शांती पूजन करावे किंवा मंदिरात नवग्रह अभिषेक करवावे.