बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 21 ऑगस्ट 2018 (16:06 IST)

कुत्र्याने केले मालकिणीचे संरक्षण

मध्य प्रदेशमधील सागर येथे एका कुत्र्याने आपली इमानदारी दाखवत मालकिणीचं संरक्षण केलं आहे. एका अल्पवयीन मुलीवर बळजबरी करू पाहणाऱ्या दोन विकृतांवर तिच्या पाळीव कुत्र्याने हल्ला केला आहे. हे दोघेही विकृत या १४ वर्षीय मुलीच्या शेजारीच राहतात. त्यांनी तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने आरडा ओरडा करायला सुरुवात केली. तिचा ओरडा ऐकून तिच्या पाळीव कुत्र्याने त्या दोघांवर हल्ला केला आणि त्यातल्या एकाचा कडकडून चावा घेतला. मुलीचा आरडा ओरडा ऐकून तिचे कुटुंबीय बाहेर आले आणि त्यांनी तिची सुटका केली. तसंच त्या दोन्ही विकृतांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.