1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 ऑगस्ट 2018 (15:44 IST)

देशात सगळ्यात जास्त पाऊस 'भंडारा'त पडला

heavy rain in bhandara
गेल्या २४ तासात राज्याच्या भंडारा जिल्ह्यात देशातील सगळ्यात जास्त पाऊस नोंदवण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात १८७ मिमी पाऊस नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती स्कायमेटकडून देण्यात आली आहे. त्याखालोखाल मध्य प्रदेशातील रायसेन- भोपाळ, तेलंगाणातील आदिलाबाद-निजामाबाद, गुजरातमधील सूरत, हिमाचल प्रदेशातील हमीरपूर, मध्यप्रदेशातील शाजापूर- खंडवा यांचा क्रमांक आहे. तर १० व्या क्रमांकावर नांदेड जिल्हा असून इथे ९३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
 
जिल्यात पाऊसाची संततधार सुरू असल्याने राजे दहेगाव येथे एक घर कोसळून एकाच कुटुंबातील 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. सुखरू दामोदर खंडाते (32), सारिका सुखरू खंडाते (28 पत्नी), सुकन्या सुखरू खंडाते (3 मुलगी) अशी तिघांची नावे आहेत.