रविवार, 7 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 20 ऑगस्ट 2018 (17:31 IST)

आगामी वर्षात पाऊसामुळे नुकसान वाढणार

Rainfall will increase
पूर, मुसळधार पाऊस आणि भूस्खलनबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने भविष्यवाणी केली आहे. यात येत्या १० वर्षात पूर आणि पावसामुळे जवळपास 16 हजार लोकांचा मृत्यू होणार आहे. तर 47000 कोटी पेक्षा जास्त संपत्तीचं नुकसान होऊ शकत. सोबतच भारताकडे प्रगत उपग्रह आणि पूर्व इशारा देणारी यंत्रणा आहे. ज्यामुळे यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकतं.
 
गृह मंत्रालयाने देशातील 640 जिल्ह्यांमधील आपत्तीबाबत अभ्यास केला आहे. डीआरआरनुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये एक नॅशनल रिजिल्यन्स इंडेक्स (एनआरआय) तयार करण्यात आलं आहे. ज्यामध्ये आपत्तीची तिव्रता, नुकसान, जीवाचा धोका याबाबत माहिती गोळा करण्यात आली आहे.