संबंधित माहिती
- रेल्वे स्थानकावर मोठा अपघात; फोन हिसकावून पाळणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग करताना २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
- 16 वर्षीय खालील मुलांसाठी सोशल मीडिया बॅन
- राजीनामा द्या नाहीतर... प्रकाश आंबेडकरांची थेट पंतप्रधान मोदींना धमकी, Epstein Files शी काही संबंध आहे का?
- आसाममध्ये झालेल्या सुखोई Su‑30MKI लढाऊ विमान अपघातात दोन वैमानिक मृत्युमुखी
- देशभरात बनावट बॉम्ब धमक्या देऊन दहशत पसरवणाऱ्या व्यक्तीला अटक; गुन्हे शाखेला मोठे यश
इराण-अमेरिका तणावाचा फटका; गॅसच्या दरात मोठी वाढ
मध्य पूर्वेतील इराण-अमेरिका-इस्रायल युद्धजन्य परिस्थितीचा फटका थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे. तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत आजपासून ६० रुपयांची वाढ झाली आहे.
तसेच माहिती समोर आली आहे की, व्यावसायिक सिलिंडरच्या दरात देखील ११५ रुपयांची वाढ करण्यात आली असून, इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज ७ मार्च २०२६ पासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे.
गेल्या अनेक महिन्यांच्या स्थिरतेनंतर झालेली ही वाढ सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम करणारी ठरणार आहे.
मध्य पूर्वेतील (इराण-इस्रायल-अमेरिका) वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमती वाढल्या आहे, ज्याचा थेट परिणाम भारतात झाला आहे. केवळ घरगुतीच नाही, तर १९ किलोच्या व्यावसायिक (Commercial) सिलिंडरच्या दरातही ११५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे हॉटेलिंग आणि बाहेरचे जेवणही महागण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजने'च्या लाभार्थ्यांना मिळणारे ३०० रुपयांचे अनुदान (Subsidy) कायम राहील, ज्यामुळे त्यांना या दरवाढीचा थेट फटका बसणार नाही. तसेच स्थानिक कर आणि वाहतूक खर्चामुळे प्रत्येक जिल्ह्यानुसार या किमतीत काही रुपयांचा फरक असू शकतो.
Edited By- Dhanashri Naik