रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 ऑगस्ट 2018 (09:10 IST)

सेल्फीच्या नादात संपूर्ण कुटुंब वाहून गेले

बुलढाणा  जिल्ह्यातील खिरोडा येथे पूर्णा नदीजवळ फोटो काढताना पाण्यात पडल्याने संपूर्ण कुटुंबच वाहून गेल्याची घटना घडली आहे. राजेश चव्हाण पत्नी व मुलासह (10) पाण्यात वाहून गेले आहेत. चव्हाण जळगावमधील जामोद येथील बुलढाणा अर्बन पतसंस्थेत नोकरीला आहेत. पत्नी व मुलासह ते शेगावला निघाले होते. पण खिरोडाजवळ येताच पूर्णा नदीजवळ सेल्फी काढण्याचा त्यांना मोह झाला. नदीकाठाजवळ उभे राहून ते तिघे सेल्फी काढत असताना पाण्यात पडले. पाण्याला वेग असल्याने ते प्रवाहात दूरपर्यंत वाहून गेल्याचे समजते. दरम्यान या घटनेबदद्ल कळताच संग्रामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस स्थानिकांच्या मदतीने चव्हाण कुटुंबीयांचा शोध घेत आहे.