सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 22 ऑगस्ट 2018 (12:58 IST)

सात राज्यांच्या राज्यपालांमध्ये फेरबदल

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी सात राज्यांच्या राज्यपालांमध्ये फेरबदल केले. त्यानुसार, बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
इतर राज्यांच्या राज्यपालपदी राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्यांमध्ये सत्यदेव नारायण आर्य यांची हरयाणाच्या राज्यपालपदी, बेबी राणी मौर्य यांची उत्तराखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, गंगाप्रसाद यांची मेघालयाच्या राज्यपालपदावरुन बदली करीत सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांची मेघालयाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर हरयाणाचे राज्यपाल कप्तान सिंग सोलंकी यांची त्रिपुराच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
सत्यदेव नारायण हे नितिश कुमार सरकारमध्ये मंत्री होते तर लालजी टंडन हे अटलबिहारी वाजपेयींचे निकटवर्तीय आणि उत्तर प्रदेशचे मंत्री राहिलेले आहेत. जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेले सत्यपाल मलिक हे एन. एन. वोहरा यांची जागा घेणार आहेत.