राखी कशी बांधाल?
1. सकाळीच स्नानसंध्या उरकून घ्या
2. आता दिवसभरात कोणत्याही शुभ मुहूर्तावर घरातील एखाद्या पवित्र स्थानावर शेणाने सारवून घ्या.
3. सारविलेल्या जागेवर स्वस्तिक तयार करा.
4. स्वस्तिकावर पवित्र पाण्याने भरलेला ताब्याचा कलश ठेवा.
5. कलशात आंब्याची पाने पसरवून ठेवा.
6. या पानावर नारळ ठेवा.
7. कलशाच्या दोन्ही बाजूस आसन पांघरूण द्या (एक आसन भावाला बसण्यासाठी आणि दूसरे स्वत:ला बसण्यासाठी)
8. आता बहिण-भाऊ कलशाला दोघांच्यामध्ये ठेवून समोरासमोर बसा.
9. त्याच्यानंतर कलशाची पूजा करा.
10. नंतर भावाच्या उजव्या हातात नारळ ठेवा किंवा डोक्यावर टॉवेल किंवा टोपी ठेवा.
11. आता भावाला अक्षतांसहित टिळा लावा.
12. यानंतर भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधा.
13. नंतर भावाला मिठाई खाऊ घालून ओवाळणी करा आणि त्याच्या प्रगती व सुखासाठी प्रार्थना करा.
14. यानंतर घरातील प्रमुख वस्तुलाही राखी बांधा. उदा. पेन, झोका, दरवाजा आदी.
पूजेच्या थाळीत काय-काय ठेवावे?
पूजेच्या थाळीत खालील सामग्री ठेवावी.
1. भावाला बांधण्यासाठी राखी.
2. टिळा लावण्यासाठी कुंकु व अक्षता
3. नारळ
4. मिठाई
5. डोक्यावर ठेवण्यासाठी लहान रूमाल किंवा टोपी
6. आरती ओवाळण्यासाठी दिवा