गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (11:17 IST)

अबलख सिनेमात पुन्हा झळकणार प्रार्थना आणि अनिकेतची जोडी

अबलख .....एकदा तरी लागतोच' आयुष्यात हया अनुभवातून प्रत्येक जण एकदातरी जातोच.अशीच गमतीर कथा घेऊन अनिकेत आणि प्रार्थना आपल्यासमोर येतायत लवकरच....
स्वप्ने माणसाला जगायला शिकवतात. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अनेक जण धडपड करत असतात. अशाच स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या चार मित्रांची कथा अबलख या सिनेमात दाखवण्यात आली आहे. आनंद शिवाजी चव्हाण दिग्दर्शित या सिनेमात प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'मस्का' सिनेमानंतर अनिकेत आणि प्रार्थनाचा हा दुसरा सिनेमा आहे. आयुष्य हा एक प्रवास असून या प्रवासाचा आनंद घेता आला पाहिजे. असा संदेश या सिनेमातून देण्यात आला आहे.या प्रवासात येणाऱ्या अडथळ्यांना योग्य प्रकारे तोंड देऊन प्रवास सुखकर कसा करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे असेही या सिनेमात मांडण्यात आले आहे. ऑक्टोबरपासून या सिनेमाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. मैत्री, प्रेम आणि आयुष्यावर आधारलेल्या अनेक संकल्पनांना विविध पद्धतीने मांडणाऱ्या या सिनेमाची निर्मिती श्री तुळजाभवानी प्रसन्न फिल्म्स या बॅनरखाली करण्यात आली आहे.