1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 14 मे 2018 (15:11 IST)

अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला अपघात

prarthana

अनिकेत विश्वासराव व अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना  घडली आहे.  अनिकेत व प्रार्थना गाडीतून मस्का सिनेमाच्या प्रमोशनसाठी निघाले होते. ते जात असताना हा अपघात झाला आहे. हा अपघात  मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळ्याजवळ  झाला आहे. यामध्ये प्रार्थना बेहरे जखमी झाली आहे. तर गाडीचे  मोठे नुकसान झाल्याचे समोर येत आहेत. यावेळी तिच्यासोबत अनिकेत विश्वासरावदेखील होता. प्रार्थना बेहेरे, अनिकेत विश्वासराव आणि प्रार्थनाची सहाय्यक स्वाती यांच्या फॉरचुनर गाडीला लोणावळ्याजवळ हा अपघात झाला आहे. हे सर्व  मुंबईहून कोल्हापूर ला मस्का च्या प्रमोशन साठी निघाले होते. यावेळी अनिकेत समोर बसला होता, त्यामुळे त्याला नक्की काय झालं ते कळलं नाही. पोलिस आणि स्थानिकांनी तात्काळ तिथे धाव घेतली आहे. हा अपघात नेमका कसा झाला यासंदर्भात अधिक माहिती घेतली जात आहे.