शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

टॅरो कार्ड : प्रत्येक समस्यांचे समाधान

भविष्याच्या गर्भात काय आहे हे जाणून घेण्याची मानवी उत्सुकता आहे. त्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. टॅरो ही अशीच एक पद्धत आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यात काय घडणार आहे याची सूचक माहिती यातून मिळते. त्यादृष्टीने नियोजन करण्यास सोपे जाते.  टॅरोच्या गठ्ठ्यात ७८ कार्डे असतात. त्यांना मेजर आर्काना व मायनर आर्काना यांच्यात विभागले आहे. आर्काना हा शब्द लॅटीन भाषेतून आला आहे. भविष्याच्या पोटात दडलेली व्यक्तिगत माहिती सांकेतिक भाषेत मांडणे असा या टॅरो शब्दाचा अर्थ आहे.