शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

मारुती सुझुकीने तब्बल 52 हजार कार परत मागवल्या

मारुती सुझुकी कंपनीने स्विफ्ट आणि बलेनो कार परत मागवल्या आहेत. तांत्रिक बिघाडामुळे कंपनीने थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल 52 हजार 686 गाड्या परत मागवल्या आहेत. या सर्व कार 1 डिसेंबर 2017 ते 16 मार्च 2018 या दरम्यान बनवल्या आहेत. यापैकी काही कारमध्ये बिघाड असल्याच्या तक्रारी कंपनीकडे आल्या होत्या. वाढत्या तक्रारीमुळे कंपनीने या  गाड्या परत मागवल्या आहेत.
 
“ज्या गाड्यांमध्ये बिघाड झाला आहे, त्यांच्यासाठी एक कॅम्पेन सुरु करण्यात येईल. त्यानुसार तो बिघाड दुरुस्त केला जाईल.” असं कंपनीने म्हटलं आहे.
या गाड्या ज्यांनी ज्यांनी खरेदी केल्या आहेत, त्या ग्राहकांशी कंपनी 14 मे 2018 पासून संपर्क साधणार आहे. यामध्ये गाडीचा बिघाड मोफत दुरुस्त केला जातो. ग्राहकांकडून एकही पैसा घेतला जात नाही.
 
दरम्यान, मारुतीने यापूर्वीही बलेनो कार परत मागवल्या होत्या. मे 2016 मध्ये या कारच्या एयरबॅगमध्ये बिघाड आला होता. त्यामुळे कंपनीने 75 हजार 419 मारुती बलेनो कार परत मागवल्या होत्या.