मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

देशात महिलांची कमाई पुरुषांपेक्षा १६.१ टक्के कमी

भारतामध्ये महिलांची कमाई पुरुषांपेक्षा १६.१ टक्के कमी आहे. याशिवाय भारतासह जगभरामध्ये नोकरीच्या ठिकाणी लिंगभेद अद्यापही सुरूच आहे. कॉर्न फेरी जेंडर पे इंडेक्सच्या अहवालातून याबाबत माहिती समोर आली आहे.
 
जागतिक स्तराचा विचार केला असता तेथेही महिलांची स्थिती सारखीच आहे. एकाच कंपनीमध्ये समकक्ष काम करणाऱ्या पुरुष आणि महिलेच्या वेतनातील फरक दीड टक्क्यांनी कमी आहे. तर सारखेच काम करणाऱ्यांमध्ये हे अंतर केवळ ०.५ टक्क्यांनी कमी होत आहे. भारतामध्ये एकाच पातळीवर काम करणाऱ्या महिला व पुरुषाच्या वेतनामधील अंतर चार टक्के आहे. तर एकसारखेच काम, जबाबदारी हाताळणाऱ्या कंपनीमध्ये हेच अंतर ०.४ टक्क्यांनी कमी आहे.
 
कॉर्न फेरी जेंडर पे इंडेक्सतर्फे, ५३ देशांतील १४ हजार कंपन्यांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये जवळपास १२.३ दशलक्ष कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा समावेश आहे. काही कंपन्यांमध्ये महिलांना सरासरीपेक्षाही कमी वेतन दिले जाते.  वेतन लिंगभेदाचे प्रमाण  चीनमध्ये  १२.१ टक्के आहे. तर ब्राझीलसारख्या देशांध्ये हाच आकडा २६.२ म्हणजेच सर्वाधिक आहे. फ्रान्समध्ये १४.१, जर्मनी १६.८, यूकेमध्ये २३.८ आणि अमेरिकेमध्ये १७.६ आहे.