रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

जियो तर्फे लवकरच मेगा भरती

रिलायन्स जिओकडून  चालू आर्थिक वर्षात  75 ते 80 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. रिलायन्स जिओच्या कर्मचाऱ्यांची  सध्या संख्या 1 लाख 57 हजार इतकी आहे. लवकरच यामध्ये 75 ते 80 हजार कर्मचाऱ्यांची भर पडेल, अशी माहिती कंपनीच्या ह्युमन रिसोर्स विभागाचे प्रमुख संजय जोग यांनी दिली आहे.  
 
रिलायन्स जिओकडून  या  आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाणार का, असा प्रश्न संजय जोग यांना विचारण्यात आला,  जोग यांना होकारार्थी उत्तर दिलं आहे. रिलायन्स जिओकडून   देशभरातील सहा हजार महाविद्यालयांशी करार केला आहे. यामध्ये तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचाही समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या संस्थांमधील काही अभ्यासक्रम रिलायन्स जिओच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार रिलायन्स जिओमध्ये काम करण्यासाठी अगदी योग्य ठरतील, असं जोग यांनी मत व्यक्त केले आहे.  सोशल मीडियाच्या माध्यमातूनही भरती करण्यात येईल, अशी माहितीदेखील जोग यांनी दिली. त्यामुळे जे दूरध्वनी तंत्र आणि   इतर अभियंता आहेत त्यांना मोठी संधी मिळाणार आहे.