बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 5 एप्रिल 2018 (16:50 IST)

आयपीएलसाठी जिओनेकडून विशेष शोची घोषणा

आयपीएलची भारतातील क्रेझ पाहता रिलायन्स जिओने बुधवारी नव्या लाईव्ह मोबाईल गेम आणि क्रिकेट कॉमेडी शोची घोषणा केली. कंपनीने स्पेशल पॅक लाँच केलाय. यात २५१ रुपयांत ५१ दिवसांसाठी जिओ टीव्हीवर लाईव्ह मॅच पाहता येणार आहेत. या पॅकमध्ये १०२ जीबी डेटा आहे. हा लाईव्ह मोबाईल गेम जिओ क्रिकेट प्ले लॉगला देशातील कोणत्याही स्मार्टफोनवर खेळता येणार आहे. ११ भाषांमध्ये ७ आठवडे ६० सामने असतील. कंपनीच्या माहितीनुसार, या गेममध्ये विजेत्यांना मुंबईत घर, २५ कार आणि कोट्यवधी रुपये रोख रकमेची बक्षिसे मिळणार आहेत. 
 
मायजियो एप आएगा कॉमेडी शो जियो 'धन धना धन लाइव' मायजिओ अॅपवर दाखवला जाईल. हा शो जिओ आणि इतर ग्राहकांसाठी निशुल्क उपलब्ध असणार आहे. याची सुरुवात ७ एप्रिलला होईल. या शोचे निवेदन सुनील ग्रोव्हर आणि समीर कोचर करतील. यात अनेक बड्या व्यक्ती सहभागी होणार आहेत.