सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 27 मार्च 2018 (12:34 IST)

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता सबस्क्रिप्शन करण्याची शेवटची तारीख जवळ आली असून लवकरच जिओकडून कोणतीतरी नवी घोषणा केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, जिओ कंपनी प्राइम मेंबरशिप सबस्क्रिप्शन पूर्ण बंद करू शकते किंवा मोफत सेवा म्हणून आधीपासून सबस्क्रिप्शन केलेल्या ग्राहकांना वापरण्याची मुभा देऊ शकते अशी शक्यताही वर्तवली जात आहे.