बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

आयडिया ग्राहकांना जलद स्पीड्‌सची सेवा उपलब्ध

आयडिया सेल्युलर या महाराष्ट्र व गोव्यामधील टेलिकॉम ऑपरेटर कंपनीने त्यांची 4जी सेवा व बॅंडविड्‌थ वाढविली आहे. ही कंपनी 1800 मेगाहर्टझमध्ये 5 मेगाहर्टझ स्पेक्‍ट्रमची भर करत आपल्या विद्यमान 4जी सेवेची क्षमता दुप्पट करत आहे. यामुळे आयडिया 4 जी ग्राहकांना विद्यमान 4जी स्पीडच्या तुलनेत दुप्पट किंवा तिप्पट स्पीड मिळू शकेल असा दावा या कंपनीने केला आहे. महाराष्ट्र व गोव्यातील 525 हून अधिक शहरे व 7,100 गावांमध्ये 7,200 हून अधिक आयडिया 4जी साइट्‌स लवकरच दुप्पट 4जी क्षमतेसह कार्यरत होतील.
 
ज्यामुळे आयडिया ग्राहकांना डाऊनलोड व अपलोड करण्यासाठी अधिक जलद स्पीड्‌सची सेवा उपलब्ध होईल. आयडिया सेल्युलरचे महाराष्ट्र व गोव्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र चौरसिया म्हणाले, आम्ही महाराष्ट्र व गोव्यातील बाजारपेठेतील प्रमुख कंपनी आहोत. आता आम्ही जलगतीने अधिक स्पेक्‍ट्रम व साइट्‌स तयार करण्यासह आमचे 4जी नेटवर्क वाढवण्यासाठी लक्षणीय गुंतवणूक करत आहोत.
 
या सर्व प्रयत्नांसोबतच आमचे व्यापक वितरण नेटवर्क आणि डिजिटल एन्टरटेन्मेंट प्ससह आमची उत्पादने ऑफर्सच्या विस्तृत श्रेणीमुळे आयडिया या सर्कलमधील आवडता 4जी नेटवर्क बनला आहे. आम्हाला विश्‍वास आहे की आमचे उपक्रम या क्षेत्रामधील आमच्या 2.7 कोटींहून अधिक ग्राहकांना सर्वोत्तम सेवेचा अनुभव देत सर्वात वेगवान 4जी नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून देतील.