गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 11 डिसेंबर 2017 (08:44 IST)

ग्राहक सुरक्षेसाठी आरबीआयची नवी सेवा

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)आर्थिक व्यवहार सुरक्षित करण्यासाठी आपली नवी सेवा सुरु केली आहे. एसएमएस (SMS)च्या माध्यमातून किंवा मिस्ड कॉलच्या माध्मयातून हेल्पलाईन सुविधा सुरु करण्यात आली आहे.

केंद्रीय बँकांद्वारे ग्राहकांना पाठवण्यात येणाऱ्या एसएमएसमध्ये म्हटलं आहे की, "मोठी रक्कम मिळण्याच्या आश्वासनांना बळी पडू नका आणि असं आश्वासन देणाऱ्या व्यक्तीकडे कुठल्याही प्रकारची रक्कम जमा करु नका. रिझर्व्ह बँक, बँकेचे गव्हर्नर किंवा सरकारही अशा कुठल्याच प्रकारचा एमएमएस, ई-मेल किंवा करत नाही." 
 
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)ने ग्राहकांच्या मदतीसाठी मिस्ड कॉल हेल्पलाईन सुरु केली आहे. ८६९१९६०००० या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. तर ८६९१९६०००० या क्रमांकावर मिस्ड कॉल करताच तुम्हाला अवघ्या काही वेळातच पुन्हा कॉल येईल. या कॉलच्या माध्यमातून विस्त्रृत माहिती दिली जाते. या कॉलच्या माध्यमातून सायबर सेल तसेच स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल करण्यासंदर्भातही माहिती दिली जाते.