मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

'त्या' नोटा बँकांनी स्वीकारणं बंधनकारक

नव्या ५०० आणि २ हजारांच्या नोटांवर जरी लिहिलेलं असेल तरीही त्या बँकाना स्वीकारण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. मात्र, या नोटा तुम्हाला बदलून मिळणार नाहीत, तर ती रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे.
 
तसेच या नोटांवर रंगही लागला असेल तरी त्या बँकांना स्वीकारणं बंधनकारक असल्याचं आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान अनेक दुकानदार १० रुपयांचं नाणं स्वीकारत नसल्याच्या तक्रारी आरबीआयकडे आल्या आहेत. पण ते नाणं वैध आहे. असंही आरबीआयनं स्पष्ट केलं आहे.