शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

अनोख हॉटेल, बिलाचे पैसे नाहीत मग भांडी घासा

टोकियापासून जवळ असलेल्या ‘मिराई शोकूडो’ नावाचं रेस्तरॉ आहे. या हॉटेलमध्ये खाल्यानंतर बिलाचे पैसे चुकते करण्यासाठी जर तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील तर त्या बदल्यात भांडी घासण्याचा किंवा ग्राहकांच्या प्लेट्स उचलण्याचा पर्याय ग्राहकांपुढे ठेवण्यात आला आहे. 

शिकाई नावाच्या ३३ वर्षीय महिलेच्या एका भन्नाट कल्पनेतून या रेस्तरॉची निर्मिती झाली आहे. येथे येणाऱ्या ग्राहकांनी बिलाचे पैसे भरले नाही तरी चालतील पण त्याबदल्यात रेस्तरॉमधलं कोणतंही एक काम करून जेवणाचे पैसे चुकवण्याची पद्धत येथे आहे. या रेस्तरॉमध्ये फक्त एकच कर्मचारी सध्या काम करत आहेत. त्यामुळे रेस्तरॉमध्ये येणारे अनेक ग्राहक पैसे चुकते करण्याऐवजी स्वखुशीनं ग्राहकांची सेवा करून आपलं बिल चुकतं करतात.

हॉटेल विषयी शिकाई म्हणते या शहरात असे हजारो लोक आहेत ज्यांना कधीतरी हॉटेलमध्ये जेवावेसे वाटतं पण बिल भरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यानं ते कधीही हॉटेलची पायरी चढत नाही, म्हणूनच खास त्यांच्यासाठी मी हे रेस्तरॉ सुरू केल्याचं ती सांगते. विशेष म्हणजे ग्राहकांना फक्त ५० मिनिटे इतर ग्राहकांची सेवा करण्याचा अवधी दिला जातो असंही ती सांगते.