1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Updated : शुक्रवार, 11 जुलै 2025 (16:26 IST)

नियमित शारीरिक संबंध ठेवणारे कमी आजारी पडतात

People who have regular physical relationship get sick less often
जर तुमचे तुमच्या जोडीदाराशी खूप चांगले नाते असेल आणि तुम्ही दोघेही एकमेकांना पाहून आनंदी असाल, तर ते तुम्ही निरोगी असल्याचे आणि दीर्घायुष्याचे लक्षण आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की चांगले आणि निरोगी शारीरिक जीवन तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवू शकते. 
 
शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी लोक अनेकदा जिम आणि फॅन्सी डाएटची मदत घेतात. पण दिवसेंदिवस वाढणाऱ्या तणावाव्यतिरिक्त अनेक समस्यांवर मात करण्यासाठी नातेसंबंधातील जवळीक हा एक उत्तम पर्याय आहे. दिवसभराच्या कामानंतर एखाद्या व्यक्तीला नियमितपणे ताणतणावाचा सामना करावा लागतो, जो मूड स्विंगचे कारण असल्याचे सिद्ध होते. अशात सुरक्षित संबंधांचा दिनचर्येत समावेश केल्याने त्याचा शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. ज्या महिला वारंवार शारीरिक संबंधाचा आनंद घेतात त्यांना त्यांच्या जोडीदाराशी अधिक खोलवरचे नाते मिळते, ज्यामुळे नातेसंबंध अधिक आनंदी होतात आणि एकूणच त्यांचे जीवन अधिक संतुलित होते. नियमित संबंध ठेवल्यामुळे शरीराला होणारे फायदे जाणून घेऊया-
 
नियमित संबंध अनेक प्रकारे मदत करु शकतं. तथापि लोकांना अजूनही याबद्दल उघडपणे बोलणे आवडत नाही. परंतु हे संबंध मानसिक आरोग्य राखण्यास आणि शरीर सक्रिय ठेवण्यास मदत करतात. विशेषतः जसजसे तुम्ही मोठे होता तसतसे नियमित क्रियाकलाप केल्याने शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात हे सिद्ध झाले आहे.
 
काय शारीरिक संबंध आरोग्यावर प्रभाव टाकतं?
नियमित संबंध ठेवल्याने शरीराला फायदा होतो. पुरुष आणि महिलांसाठी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायाम म्हणून हे फायदेशीर आहे. याशिवाय ते रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास, हृदयरोगांपासून आराम देण्यास, कॅलरीज साठवण्यापासून रोखण्यास आणि स्नायूंची ताकद वाढविण्यास मदत करते.
 
या व्यतिरिक्त फायदे जाणून घ्या-
इमोशनल बॉडिंग मजबूत होते- अनेकदा वयानुसार, पती-पत्नीमधील नात्यात तणाव वाढू लागतो. अशात नियमित संबंध जोडप्यांमधील भावनिक जवळीक आणि खोलवरचे बंधन वाढवते. ऑक्सिटोसिनला प्रेम संप्रेरक म्हणतात, जो शारीरिक स्पर्शादरम्यान सोडला जातो. हे संप्रेरक भावनिक बंध मजबूत करण्यास मदत करते आणि भागीदारांमधील विश्वास आणि प्रेम वाढवते. यामुळे अधिक समाधानकारक आणि स्थिर संबंध निर्माण होतात.
 
चांगली झोप येते- यामुळे शरीरात ऑक्सिटोसिन म्हणजेच प्रेम संप्रेरकाचे प्रमाण वाढते आणि संबंध ठेवताना एंडोर्फिन बाहेर पडतात. या दोन्ही संप्रेरकांच्या संयोजनामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. यामुळे शरीराला अधिक आराम मिळतो आणि उर्जेची पातळी देखील वाढते.
 
रोगप्रतिकारक शक्ती सुधारते- जे लोकं नियमित शारीरिक संबंध ठेवतात त्यांच्या लाळेमध्ये इम्युनोग्लोबुलिन ए आयजीए जास्त होते. IgA हा एक प्रकारचा अँटीबॉडी आहे जो रोग रोखण्यासाठी महत्त्वाचा ठरतो आणि मानवी पॅपिलोमाव्हायरस किंवा HPV विरूद्ध संरक्षण म्हणून काम करतो. यामुळे महिला रोग आणि संसर्गांशी लढण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होतात.
हृदयरोग कमी होतात- नियमित संबंध ठेवल्याने हृदयाचे ठोके, रक्ताभिसरण आणि ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे हृदयाचे एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते. महिलांमध्ये हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी नियमित संबंध ठेवणे प्रभावी आहे. एका अहवालानुसार नियमित क्रियाकलाप हृदयरोग असलेल्या पुरुष आणि महिलांसाठी रुग्ण आणि जोडीदार दोघांच्याही जीवनाची गुणवत्ता सुधारते.
 
ताण कमी होतो- यामुळे आयुष्यात दिवसेंदिवस वाढणारा ताण कमी होऊ शकतो आणि सकारात्मक मूड वाढवण्याची क्षमता सुधारते. खरंतर शारीरिक संबंध ठेवताना शरीर एंडोर्फिन सोडते, ज्यामुळे व्यक्तीला आनंद मिळतो. ही रसायने तणाव आणि चिंता यांचा सामना करण्यास मदत करतात, ज्यामुळे महिलांना अधिक आरामशीर आणि समाधानी वाटते. नियमित संबंध ठेवल्याने भावनिक कल्याण आणि एकूण आनंदाचे चक्र निर्माण होऊ शकते.
 
पेल्विक मसल्स मजबूत होतात- इंटिमेसी आरोग्यासाठी फायद्याचे ठरते तसेच याने पेल्विक फ्लोर मसल्सची मजबूती देखील वाढते. याच्या मदतीने गर्भाशय आणि ब्लेंडर देखील निरोगी ठेवता येतात. या क्रिया परस्पर प्रेम आणि समज वाढवते, तर शरीराच्या खालच्या भागाचे स्नायू देखील मजबूत करते आणि आरोग्य समस्यांचा धोका कमी करते. यामुळे योनीशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
 
पोटाची चरबी कमी होते- एका रिसर्चप्रमाणे पुरुष या दरम्यान प्रति मिनिटे सुमारे 4.2 कॅलरीज बर्न करतात तर महिला प्रति मिनिट 3.1 कॅलरीज बर्न करते. अशात शारीरिक संबंध ठेवल्याने कॅलोरी स्टोरेज यापासून वाचता येते आणि शरीर निरोगी राहते.
नेचरल पेन किलर- शारीरिक संबंध ठेवताना एंडोर्फिनचे स्राव केवळ ताण कमी करत नाही तर हे नेचरल पेन किलर म्हणून काम करते. तज्ञांच्या मते काही महिलांना शारीरिक संबंधात सहभागी झाल्यानंतर डोकेदुखी, मासिक पाळीतील पेटके आणि शरीराच्या इतर वेदनांपासून तात्पुरता आराम मिळतो.
 
डिस्क्लेमर: ही माहिती आरोग्यासाठी अचूक, विश्वासार्ह आणि प्रामाणिक माहिती प्रदान करण्याचा प्रयत्न आहे. तरीही, वेबदुनिया वेबसाइटवर सादर केलेली सामग्री केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. ते तज्ञ वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय मानू नये. विशिष्ट आरोग्य स्थिती आणि चिंतांसाठी नेहमीच पात्र आरोग्य व्यावसायिकांकडून वैयक्तिकृत सल्ला घ्या.