गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

उषा जाधवनेही कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला

आता राष्ट्रीय पुरस्कार विजेती असलेली मराठी अभिनेत्री उषा जाधवनंही कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे.  चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊचचा अनुभव येणं ही सामान्य गोष्ट आहे.   मला एकदा विचारणा केली होती की, जर संधी दिली, तर बदल्यात काय देशील? त्यावेळी माझ्याकडे पैसे नसल्याचं मी त्यांना सांगितलं होतं. तेव्हा समोरची व्यक्ती म्हणाली, नाही.. पैशाची गोष्ट नाही, जर निर्माता किंवा डायरेक्टर अशा कोणाला तुझ्यासोबत झोपायचं असेल तर तू तयार आहेस का, अशी विचारणा केल्याचं उषा जाधवानं सांगितलं. 
 
तसेच तो बोलत असताना माझ्या शरीराच्या कुठेही हात लावत होता. त्यानं माझं चुंबनही घेतलं. त्या प्रकारानं मी अचंबित झाले.  मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता चित्रपटसृष्टीत काम करायचंय की नाही, अशी विचारणा त्यानं केली. तसेच तुझी वृत्ती योग्य नसल्याचंही तो म्हणाल्याचं उषा जाधवनं सांगितलं.