मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

अंबानीची मुलगी होणार पिरामल यांची सून

उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी येत्या डिसेंबरमध्ये उद्योगपती अजय पिरामल यांचा मुलगा आनंद याच्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. दोन्ही कुटुंबात बर्‍याच वर्षांपासून मैत्रीची संबंध आहे ते आता नात्यात रुपांतरित होणार आहे. आनंद यांनी महाबळेश्वरमधील एका मंदिरात ईशाला लग्नाची मागणी घातली. 
 
आनंद यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. ते सध्या पिरामल एंटरप्राइझचे कार्यकारी संचालक आहेत. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेवियामधून अर्थशास्त्राची पदवी मिळवली आहे. बिझनेस स्कूलमधून बाहेर पडल्यावर त्यांनी दोन स्टार्टअप सुरू केले.
 
ईशा अंबानी रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेल बोर्डाची सदस्य आहे. तिने येल विद्यापीठातून मानसशास्त्र आमि साऊथ एशियन स्टडीज या विषयांत पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे.