संबंधित माहिती
- रॅपर टेविन हूडची गोळ्या घालून हत्या, घरात मृतदेह आढळला
- Suniel Shetty Birthday जेव्हा एक अॅक्शन हिरो एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडला, कुटुंबाला पटवून देण्यासाठी ९ वर्षे लागली
- पहलगाम हल्ल्यात पतीला गमावलेल्या हिमांशी नरवालची बिग बॉसमध्ये एन्ट्री?
- सूरज बडजात्या यांनी सलमान सोबतच्या चित्रपटाबद्दल मोठे अपडेट दिले
- दीपिका पदुकोणने इन्स्टाग्रामचा विक्रम मोडला, 1.9 अब्ज व्ह्यूज मिळवले
मराठमोळा अभिनेता सुयश टिळकच्या गाडीला अपघात, तासभर मदत मिळाली नसल्याचे म्हणाला
facebook suyash tilak
अपघातांनंतर अभिनेत्याने 6-7 तास ट्रक मधून प्रवास करून मुंबई गाठले.माझी गाडी अशा ठिकाणी बंद पडली जिथे मला कोणाचीही मदत मिळू शकली नाही. तासाभरानंतर त्याला मदत मिळाली.
सुयशने आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे. वाहन न चालवता केलेला हा माझा सर्वात लांब प्रवास होता. थोडासा अपघात झाला, पण सुदैवाने कुठलीही दुखापत झाली नाही. मात्र गाडीचं इतकं नुकसान झालं की ती बंद पडली.
अपघात अशा ठिकाणी झाला जिथे मला कोणतीही मदत मिळत नव्हती.”“घरी जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गाडी टो करून मुंबईत आणणे. साधारण तासभर वाट पाहिल्यानंतर मदत पोहोचली. टो ड्रायव्हरनं सांगितलं की, आत बसा, गाडीला कधी मदतीची गरज भासली तर. माझी गाडी तर अक्षरशः श्वासही घेऊ शकत नव्हती! मग मी एसी नसलेल्या शांत गाडीत बसलो होतो. 6-7 तास महामार्गावरून ओढत नेलं जात होतं. रस्त्यावरचे लोक आत डोकावत होते, काहीजण हसत होते, तर काही अंदाज बांधत होते की नेमकं काय झालं असेल.”
या प्रवासादरम्यान तो रागावू शकला असता, चिडू शकला असता, पण त्यानं संयम ठेवला. “कधी कधी आयुष्य तुमच्यासमोर जी परिस्थिती आणतं, ती तशीच स्वीकारावी लागते. मी पुस्तक वाचलं, संगीत ऐकलं, थोडा झोपलो आणि या असामान्य प्रवासाचा आनंद घेतला,” दिवसभराचा अनुभव मोबाईलमध्ये टिपून एडिट करून मिनी व्लॉग बनवला प्रेक्षकांना आनंद घेण्यासाठी. असं सुयशनं सांगितलं.
Edited By - Priya Dixit
