1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

लक्षवेधक असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ चे पोस्टर प्रदर्शित

mee shivaji park
अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर  लवकरच ते ‘मी शिवाजी पार्क’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ‘न्याय देवता आंधळी असते.. आम्ही डोळस होतो’, अशी टॅगलाईन आहे. नुकतच या चित्रपटाचं दुसरं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. काही दिवसापूर्वी दिग्दर्शक, लेखक अभिराम भडकमकर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. 
 
या चित्रपटामध्ये अभिनेता दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, शिवाजी साटम, अशोक सराफ आणि सतीश आलेकर ही तगडी स्टारकास्ट झळकणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, गौरी पिक्चर प्रोडक्शन अंतर्गत तयार होणारा हा चित्रपट १८ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.