रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 18 सप्टेंबर 2018 (11:00 IST)

मराठीचा नादखुळा

मास्तर वर्गात तोंडी परीक्षा  घेत असतात...
मास्तर - कावळा सरळ का उडतो?
संतोष - कारण तो विचार करतो  की
उगाचच... "का-वळा"? 
 
मास्तर - जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल?
 :
 :
संतोष -  फुल भाजी 
 
मास्तर - होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाही ? 
संतोष - कारण तीकडे वाढायला वेटर्स असतात ना...  
 
मास्तर - भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?  
संतोष - हिंदुस्तान लिव्हर 
 
मास्तर - हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते..
संतोष - कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात  
 
मास्तर - हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
संतोष - ओला होईल 
 
मास्तर - जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते ? 
संतोष - घड्याळ दुरुस्त करण्याची !  
 
मास्तर - रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???
संतोष - कारण लहानपणी रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे…  
 
मास्तर - जर मँगो फ्लेवर चा चहा बनवला तर त्याला काय म्हणाल
संतोष - आमटी   ......
 
मास्तर गायब झाले......