बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (12:14 IST)

सैफ आणि राधिकाचा 'बाजार' ऑक्टोबरमध्ये

पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची कमाल दाखवण्यास अभिनेता सैफ अली खान सज्ज   झाला असून तो 'बाजार' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जाहीर करण्यात आली आहे. 
 
सैफ अली खानसह या चित्रपटात राधिका आपटे देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या कलाकारांच्या जोडीला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहाणे औत्सुक्याचे असणार आहे. हा चित्रपट येत्या 26 ऑक्टोबरला प्रदर्शित केला जाणार आहे. प्रदर्शनाची ही तारीख सोशल मीडियावर चित्रपट निर्माता निखिल अडवाणीने जाहीर केली आहे. त्याने या पोस्टला शेअर करत, 'बाजार' चालू आहे आणि त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना अतिशय आनंद होत असल्याचे कॅप्शनही दिले आहे. एक वेगळा आशय घेऊन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सैफचीदेखील एक वेगळी भूमिका  प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.