सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सैफला आवडला नाही करीनाचा हा हॉट अंदाज, म्हणाला कपडे बदलून ये

तैमूरच्या जन्मानंतर करीना कपूर खान 'वीरे दी वेंडिंग' चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये परत एंट्री करत आहे. करीना सद्या आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनात बिझी आहे. प्रमोशनाच्या वेळेस करीना हॉट आणि स्टायलिश लुकमध्ये दिसत आहे.
पण करीनाचा हा हॉट अंदाज तिचा नवरा सैफला आवडलेला नाही म्हणूनच त्याने करीनाला लगेचच कपडे बदलण्याचा सल्ला दिला. या गोष्टीचा खुलासा स्वत: करीनाने एका मुलाखतीत दिला आहे.
 
प्रमोशनमध्ये करीना एक फारच सुंदर ब्लॅक ड्रेसमध्ये आली होती, पण सैफला हा ड्रेस काही आवडला नाही, ही गोष्ट करीनाने स्वत: सांगितली आणि म्हणाली, 'जेव्हा मी इवेंट नंतर घरी केली तेव्हा सैफ म्हणाला ही हा ड्रेस का घातला? जा कपडे बदलून ये'.
 
शशांक घोषचे चित्रपट 'वीरे दी वेडिंग' 1 जून रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात करीनासोबत सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया देखील दिसणार आहे.