गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 28 मे 2018 (11:28 IST)

शाहिद कपूरने करिनाला म्हटले सीनिअर अ‍ॅक्टर...

अभिनेता शाहिद कपूर मीराराजपूतबरोबर विवाह करून सेटल झाला आहे व करिना कपूरनेदेखील सैफबरोबर विवाह करून आपला संसार थाटला आहे. एक काळ असा होता जेव्हा शाहिद व करिनाच्या प्रेमाच्या चर्चांना उधाण आले होते. हे दोघेही प्रदीर्घ काळापर्यंत रिलेशनशीपमध्ये होते व त्यानंतर 2007 मध्ये ते वेगळे झाल्याचे म्हटले जाते. 2004 मध्ये आलेला चित्रपट फिदाच्या शूटिंगवेळी या दोघांनी एकेमेकांना डेट करण्यास सुरुवात केल्याचे खूप कमी जणांना ठाऊक असावे. करिनाने 2000 मध्ये जे. पी. दत्तांचा चित्रपट रिफ्युजीद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते व शाहिदचा पहिला चित्रपट 2003 मध्ये आलेला इश्क विश्क होता. एका मुलाखतीत शाहिद कपूरने करिनाला सीनिअर अॅक्टर म्हटले होते. शाहिद म्हणाला, आम्ही केन घोषच्या चित्रपटाबरोबर काम करणे सुरू केले होते व ही माझ्याकरिता सन्मानाची गोष्ट आहे की, मी त्यांच्याबरोबर काम करत आहे. ती माझी सीनिअर अ‍ॅक्टर आहे. करिनाला शाहिदची ही गोष्ट खूप विचित्र वाटली व तिने व्हॉट रबिश! असे म्हणत यावर अ‍ॅक्शन दिले.