गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

रणवीर-दीपिकाच्या लग्नाचा मुहूर्त 19 नोव्हेंबरचा?

होणार, होणार अशी चर्चा असलेले बॉलिवूडचा  'बाजीराव' रणवीर सिंग व दीपिका पदुकोण या दोघांचे लग्न अखेर ठरले आहे. येत्या 19 नोव्हेंबरला हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 
 
'राम-लीला', 'बाजीराव-मस्तानी' आणि 'पद्मावत' सिनमांमधून एकत्र काम करणार्‍या - दीपिकाध्ये अफेअर सुरू असल्याची चर्चा खूप आधीपासूनच सुरू होती. दीपिका आणि रणवीरने अनेकदा एकेकांचे कौतुक केले असले तरी अफेअरची कबुली कधीच दिली नव्हती. मात्र, त्यांच्याबद्दलच्या अफवा सुरूच राहिल्या. गेल्या वर्षभरापासून तर त्यांच्या लग्नाचीही चर्चा सिनेजगतात सुरू होती. ती खरी असल्याचे आता समोर येते.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही भारताबाहेर एका रम्य ठिकाणी 'डेस्टिनेशन वेडिंग' करणार आहेत. दाक्षिणात्य आणि पंजाबी अशा दोन्ही पद्धतींनी त्यांचा विवाह होणार आहे.