मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

नेहा धुपियाने केला गुपचुप विवाह

बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपियाने अभिनेता अंगद बेदी सोबत गुपचुप विवाह केला आहे. दिल्ली येथे पंजाबी पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला.  'बीएफएफ विथ वोग' या टी.व्ही शोमुळे चर्चेत असणाऱ्या नेहाने लग्नाची कुठेच वाच्यता न करता गुपचुप पद्धतीने लग्न उरकल्याने याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. नेहाने ट्विटरवर विवाह सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. तिने ‘माझ्या जीवनातील सर्वात महत्वाचा निर्णय...मी माझ्या जीवलग मित्रासोबत लग्न केले...’ अशी कॅप्शन  देत हा फोटो शेअर केला आहे.

अंगद हा भारताचे माजी क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांचा मुलगा आहे. अंगदने वडिलांप्रमाणे  क्रिकेट सामने खेळले आहेत. दिल्लीत झालेला 'रणजी ट्रॉफी' सामनादेखील त्याने खेळला आहे. यानंतर तो मॉडेलिंगकडे वळला आणि त्याच्या सीने करिअरला सुरूवात झाली. अंगद याने 'उंगली', 'पिंक', 'टाइगर जिंदा है' या चित्रपटामध्ये काम केले आहे.