शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 9 मे 2018 (09:12 IST)

सोनम-आनंदचा झाला विवाह ‘या’पद्धतीने झाला

बॉलिवूडची अभिनेत्री व फॅशन दिवा सोनम कपूरने प्रियकर आनंद आहुजाबरोबर लग्न गाठ बांधली. शिख पद्धतीने सोनम-आनंदचा विवाह सोहळा संपन्न झाला. सोनमच्या आनंद कारजचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आनंद कारज हे हिंदू धर्माच्या विवाहच्या पद्धतीपासून पूर्णपणे वेगळे असते. आनंद कारजची रसम सकाळी होते. पारंपरिक हिंदू विवाहांमध्ये लग्न, मुहूर्त, जन्मपत्रिका मिळवणे गरजेच असते पण आनंद कारजमध्ये याला विशेष महत्त्व नाही. शिख धर्मात जे लोक गुरूवर पूर्ण श्रद्धा ठेवतात तेच आनंद कारज करतात. त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस पवित्र असतो.
सोनमच्या आनंद कारजचे विधी सकाळी 11 वाजता सुरू होऊन 12.30 पर्यंत चालले. लाल ओढणीच्या छायेमध्ये भाऊ हर्षवर्धन कपूर व अर्जुन कपूरने सोनमला विवाह मंडपापर्यंत आणले.