1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

खास आहे 'जख्मी जूतों का अस्पताल'

'जख्मी जूतों का हस्पताल', हेच नाव आहे रस्त्याचा बाजूला असलेल्या एका दुकानाचे, जिथे एक चांभार जोडे-चपला सुधारवण्याचे काम करतो. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या दुकानाचा एक फोटो ट्विट केला आहे. हा फोटो शेअर करत महिंद्रा यांनी म्हटले की या व्यक्तीकडून मॅनेजमेंट विद्यार्थ्यांनी मार्केटिंग युक्ती शिकायला हवी.
 
खरं तर, एका चांभाराने आपल्या दुकानावर बॅनर लावले होते, 'जख्मी जूतों का हस्पताल' अर्थात जखमी जोड्यांचे रुग्णालय आणि यावर ओपीडी आणि लंच टाइम व्यतिरिक्त आणखी माहिती लिहिलेली होती. मुख्य म्हणजे आनंद या चांभाराशी प्रभावित झाले त्याची मदत करू इच्छित असल्याचे म्हटले. त्यांच्या टीमने चांभाराची माहिती काढून घेतली आहे.
चांभाराचे नाव नरसीराम असे आहे. महिंद्रा यांनी लिहिले की आमची टीम नरसीरामाला भेटली. त्याने पेश्याची मागणी केली नसून फक्त कामासाठी योग्य जागेची गरज असल्याचे म्हटले. आनंद यांनी आपल्या डिझाइन स्टुडिओ टीमला एक चालत-फिरत असणारी दुकान डिझाइन करायला सांगितले आहे.