गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

जेव्हा कृष्ण पुत्र पडला दुर्योधन पुत्रीच्या प्रेमात

महाभारतातील अनेक प्रसंग प्रचलित नाही त्यामुळे काही प्रसंग जाणून घेतल्यावर आपल्याला आश्चर्य वाटू शकतं. अश्याच एका नात्यामुळे कृष्ण आणि दुर्योधन यांच्या कुटुंबाची खळबळ उडाली होती आणि शेवटी भयानक युद्ध झालं.
 
प्रभू कृष्ण यांच्या 8 बायकांमधून एक होती जाम्बवती. जाम्बवती-कृष्ण यांच्या पुत्राचे नाव सांब होते. आणि या पुत्रामुळेच कृष्ण वंशाचा नाश झाला होता. महाभारत कथेनुसार सांब दुर्योधन आणि भानुमती यांच्या पुत्री लक्ष्मणाच्या प्रेमात पडला होता. ते दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. दुर्योधन आपल्या मुलीचे विवाह कृष्ण पुत्रासोबत करू इच्छित नसल्यामुळे एके दिवशी सांब आणि लक्ष्मणा दोघांनी प्रेम विवाह केले आणि रथात बसून द्वारकेकडे जाऊ लागले. ही गोष्ट कौरवांच्या कानात पडल्याक्षणी कौरवी पूर्ण सेना घेऊन सांबशी युद्ध करायला पोहचले.
 
कौरवांनी सांबला बंदी घातले. ही गोष्ट जेव्हा कृष्ण आणि बलराम यांना कळली तेव्हा बलराम हस्तिनापूर पोहचले आणि सांबच्या मुक्तीसाठी विनम्रपूर्वक याचना केली परंतू कौरवांनी ती स्वीकारली नाही. अशात बलराम क्रोधित झाले आणि आपल्या नांगराने हस्तिापुराची संपूर्ण धरा खेचून गंगेत बुडवण्याला निघाले. हे बघून कौरव घाबरले. सर्वांनी बलरामाची माफी मागितली आणि सांबला लक्ष्मणासोबत निरोप दिला. नंतर द्वारकेत सांब आणि लक्ष्मणा यांचे वैदिक रित्या विवाह संपन्न झाले.