शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दसरा
Written By

फलदायी आहे प्रभू रामाचे हे 10 अद्भुत मंत्र

राम नावाची शक्ती असीम आहे. त्यांच्या नावाचे दगड पाण्यात तरंगले. त्यांनी चालवलेला बाण रामबाण अचूक म्हणून ओळखला गेला मग अश्या प्रभू रामाच्या मंत्राची शक्ती तर काही वेगळीच आहे. जाणू रामाचे काही मंत्र ज्यांचा जप केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.


 
(1)  'राम' हा मंत्र स्वत:मध्ये पूर्ण आहे. ह्या मंत्राचा जप कोणत्याही परिस्थित केला जाऊ शकतो. हा तारक मंत्र आहे.
 
(2) 'रां रामाय नम:' हा मंत्र राज्य, लक्ष्मी पुत्र, आरोग्य व आणि विपत्तीचा नाश करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

(3) 'ॐ रामचंद्राय नम:' या मंत्राचा जप केल्याने क्लेश दूर होतात.
 
(4) 'ॐ रामभद्राय नम:' मंत्र कार्यात येणारे अडथळे दूर करण्यात मदत करतं.


(5) 'ॐ जानकी वल्लभाय स्वाहा' या मंत्राने प्रभूची कृपा प्राप्त होत असून सर्व इच्छा पूर्ण होतात.
 
(6) 'ॐ नमो भगवते रामचंद्राय' संकटापासून मुक्तीसाठी जपावा.


(7) 'श्रीराम जय राम, जय-जय राम' हा मंत्र कोणत्याही अवस्थेत जपण्या योग्य आहे.
 
(8) श्रीराम गायत्री मंत्र 'ॐ दशरथाय नम: विद्महे सीता वल्लभाय धीमहि तन्ना राम: प्रचोदयात्।' मंत्र संकट मिटवून सिद्धी देणारे आहे.


(9) 'ॐ नम: शिवाय', 'ॐ हं हनुमते श्री रामचंद्राय नम:।' ह्या मंत्राचे अनेक फल आहे.
 
साधारणपणे हनुमानाचे मंत्र उग्र असतात पण शिव व राम मंत्रासह जपल्याने त्याची उग्रता समाप्त होते.
 
(10) 'ॐ रामाय धनुष्पाणये स्वाहा:' हा मंत्र शत्रूचा नाश, न्यायालयासंबंधी केस व इतर समस्यांपासून मुक्ती देण्यासाठी योग्य आहे.