संबंधित माहिती
- Masan Holi 2026 काशीची मसान होळी, मृत्यूचा उत्सव आणि अघोरी भक्तीचा सोहळा!
- New flavors of Karanji; यंदाच्या होळीला पारंपारिक करंजीचे हे हटके फ्लेवर्स नक्की बनवून पाहा
- तुम्हालाही होळीचे वेगवेगळे रंग अनुभवायचे असतील तर देशातील या ठिकाणी नक्कीच भेट द्या
- नवीन सुनेची ही पहिली होळी, सासूने या चुका करणे टाळा
- Holi 2026: लाठमार पासून ते फूल होळीपर्यंत, भारतात किती प्रकारे होळी साजरी केली जाते? जाणून घ्या खास परंपरांबद्दल
घरात मैदा नाही का? गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत करंज्या बनवा
मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या करंज्या आरोग्यासाठी पौष्टिक तर असतातच, पण त्या योग्य पद्धतीने केल्यास मैद्याच्या करंजीपेक्षाही जास्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. गव्हाच्या पिठाच्या कुरकुरीत करंज्या बनवण्याची ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा
साहित्य-
२ वाट्या गव्हाचे पीठ
२ मोठे चमचे बारीक रवा
१ मोठा चमचा कडकडीत गरम तेलाचे 'मोहन',
चिमूटभर मीठ
कोमट दूध किंवा पाणी
कृती-
सर्वात आधी गव्हाच्या पिठात रवा आणि मीठ मिक्स करा. त्यात कडकडीत गरम तेल घालून पीठ हाताने व्यवस्थित चोळून घ्या. आता थोडे थोडे कोमट दूध घालत पीठ घट्ट मळून घ्या. पीठ जितके घट्ट असेल, तितकी करंजी तेल कमी पिते आणि जास्त कुरकुरीत होते. हे पीठ अर्धा तास झाकून ठेवा.
गोड सारण बनवण्यासाठी
साहित्य-
१ वाटी किसलेले सुके खोबरे
१ वाटी पिठीसाखर
अर्धी वाटी बारीक रवा (भाजलेला)
२ चमचे खसखस
वेलची पूड
ड्राय फ्रूट्सचे तुकडे
कृती-
सर्वात आधी सुके खोबरे आणि खसखस मंद आचेवर हलकी गुलाबी रंगावर भाजून घ्या. रवा आधीच भाजून घ्यावा. हे सर्व जिन्नस एकत्र करून त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड मिसळा. तुमचे चविष्ट सारण तयार आहे.
करंजी कशी घडवावी?
मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून अगदी पातळ पोळी लाटा.
पोळीच्या मध्यभागी १-२ चमचे सारण भरा.
पोळीच्या कडांना थोडे दूध किंवा पाण्याचा हात लावा आणि पोळी दुमडून कडा व्यवस्थित दाबून बंद करा.
तळण्याची खास टीप-
करंज्या तळताना तेल मध्यम गरम असावे. खूप कडक तेलात करंज्या टाकल्यास त्या बाहेरून लाल होतात पण आतून मऊ राहतात.
मंद ते मध्यम आचेवर करंज्या दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळा.
गव्हाच्या करंजीचे फायदे-
पचायला हलकी: मैद्यापेक्षा गव्हाचे पीठ आरोग्यासाठी उत्तम असते.
जास्त काळ टिकतात: या करंज्या हवाबंद डब्यात ठेवल्यास १५-२० दिवस आरामात कुरकुरीत राहतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: होळीला बनवा चॉकलेट करंजी रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: गुलकंद करंजी रेसिपी
