गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 28 मे 2018 (08:46 IST)

सुजितच्या 'उधम सिंह' मध्ये इरफान खानची मुख्‍य भूमिका

बॉलिवूड अभिनेता इरफान खान गेल्या काही दिवसांपासून आजारी असून उपचारांसाठी तो परदेशात गेला आहे. त्यानंतर इरफानने ट्‍विटरवरून प्रकृतीची माहिती दिली होती. आता निर्माते आणि इरफान खानचे जवळचे मित्र सुजित सरकार यांनी इरफानच्‍या प्रकृतीत सुधारणा असल्‍याचे म्‍हटले आहे. त्‍याचबरोबर सुजित यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची 'उधम सिंह'ची घोषणा केली. या सिनेमात इरफान खानची मुख्‍य भूमिका असणार आहे. 

याआधी सुजित आणि इरफान यांनी 'पीकू' सिनेमात काम केले आहे. एका मुलाखतीत सुजित म्‍हणाले की, 'आगामी  बायोपिकमध्‍ये इरफान खानची प्रमुख भूमिका असणार आहेत. गेल्‍या १८-१९ वर्षांपासून या सिनेमाच्‍या कथेवर काम करत आहे.' हा सिनेमा क्रांतीकारी उधम सिंह यांच्‍यावर आधारित आहे.