गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 26 मे 2018 (09:10 IST)

‘केबीसी' १० साठी ६ जूनपासून नावनोंदणी

‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतआहे. यात सहभाग घेण्यासाठी ६ जूनपासून नावनोंदणी करता येणार आहे. तसेच ऑगस्टमध्ये हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दहाव्या सत्रामध्ये एकूण ३० भाग दाखविण्यात येणार आहेत. 

१. येत्या ६ जूनपासून अमिताभ बच्चन रात्री ८.३०वाजता छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येतील. या भेटीत ते प्रेक्षकांना दररोज एक प्रश्न विचारतील. या प्रश्नांची उत्तरे देऊन प्रेक्षक आपल्या नावाची नोंदणी करु शकतात.

२. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे स्क्रिनवर दिलेल्या क्रमांकावर मेसेज करुन किंवा आयव्हीआरएस यांच्यामार्फत द्यावी लागणार आहेत. तसेच सोनी लाईव्हच्या माध्यमातूनही उत्तर देता येतील.
३. ६ जूनपासून सुरु होणारी ही प्रश्नमंजुषा ३० जूनपर्यंत सुरु राहणार आहे. यामध्ये सर्वात जास्त योग्य उत्तरे देणा-या व्यक्तीला ऑडिशनसाठी बोलावण्यात येईल. त्यानंतर निवड झालेल्या व्यक्तीला केबीसीच्या हॉटसीटवर बसण्याची संधी मिळेल.